यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार?; भाजीपाला गेला सडून, कडधान्याला लागली कीड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 06:08 AM2020-05-07T06:08:28+5:302020-05-07T06:08:38+5:30

बळीराजा संकटात

Paddy season will also be missed this year ?; The vegetables rotted, the cereals became infested | यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार?; भाजीपाला गेला सडून, कडधान्याला लागली कीड 

यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार?; भाजीपाला गेला सडून, कडधान्याला लागली कीड 

Next

वाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाला तसेच कडधान्याचे पीक चांगले आले, पण लॉकडाऊनमुळे मार्केट बंद होते. संचारबंदीमुळे भाजीपाला शेतातच सडून गेला. तर कडधान्यही विकले जात नसल्याने त्यालाही कीड लागू लागली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून काहीच पैसे हाती आले नसल्याने यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार का, अशी चिंता त्यांना भेडसावते आहे.

सरकारने यंदा थकित शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले होते. ध्यानीमनी नसताना अचानकच कोरोनाचे संकट देशावर ओढावले. यातून बाहेर येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून आता सरकारही आर्थिक संकटात सापडले आहे. यामुळे शेतकºयांचा प्रश्न मागे पडला. या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. जेणेकरून भातशेतीचा हंगाम तरी हातून निघून जाऊ नये. बळीराजा पुन्हा उभारी घेईल, अशी काही तरी ठोस उपाययोजना शासनाने करावी, अशी मागणी शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी केली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीने भातशेती वाया गेली. तर यंदा कोरोनामुळे शेतकºयांच्या सगळ्या आशा धुळीस मिळाल्या. यातून सावरण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

Web Title: Paddy season will also be missed this year ?; The vegetables rotted, the cereals became infested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी