पालघर व कोकण पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:44 PM2019-09-07T23:44:49+5:302019-09-07T23:44:57+5:30

जागतिक स्तरावर पहिली चिकू वायनरी पालघरच्या बोर्र्डीनजीक उभारून वर्ल्ड वाईन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका सावे यांना काय वाटतं ?

Palghar and Konkan tourism development in a big way! | पालघर व कोकण पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर!

पालघर व कोकण पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणावर!

googlenewsNext

अनिरुद्ध पाटील 

फळ वाईन व मीड उद्योगाला चालना देण्याकरिता उत्पादन शुल्क विभागाने द्राक्षा व्यतिरिक्त फळ वाईन्स व मीडवर प्रति बल्क लीटर एक रूपया उत्पादन शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन घेतले जाते मात्र फक्त दोन वायनरी आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे त्या वाढतील जागतिक स्तरावर पहिली चिकू वायनरी पालघरच्या बोर्र्डीनजीक उभारून वर्ल्ड वाईन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका सावे यांना काय वाटतं ?

प्रश्न: वायनरी उद्योगाबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे?
पूर्वी द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाईन्स व मीड (मधापासून बनवलेली वाईन)ला शंभरटक्के उत्पादन शुल्क आकारले जायचे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होऊन या वाईन्सची किंमत खूपच जास्त असल्याने खप कमी होता. हा व्यवसाय टिकविण्याकरिता दिव्यच करावं लागत होतं. मात्र उत्पादन शुल्क विभागाने मीड आणि जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद आणि काजू बोंडापासून तयार होणाºया वाईनला प्रति बल्क लीटरवर फक्त एक रुपया उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने या पुढे त्याचा परिणाम होऊन विशेषत: कोकणातील वायनरी उद्योगाला चालना मिळेल.

हा महत्वाचा निर्णय घ्यायला शासनाकडून उशीर झाला? का?
नक्कीच! उशीर झाला आहे. मात्र देर आए, दुरु स्त आए असं मी म्हणेन. मागील दहा वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता. कोकण पर्यटन उद्योग संघाचे संस्थापक माधव भंडारी, वाईन उद्योग यांच्या मार्फत सातत्याने प्रयत्नशील होतो. शिवाय आमदार मनिषा चौधरी, पालघरचे माजी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या पाठ पुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आण िउत्पादन शुल्क मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे या बाबत आभार मानेन.

सध्या वायनरी उद्योगाची परिस्थिती काय आहे?
राज्यात द्राक्षा व्यतिरिक्त वायनरी या वाई, पुणे, रत्नागिरी आणि बोर्डीनजीक आहेत. त्यापैकी कोकणात रत्नागिरीतील सावर्डे येथे निलेश लेले यांची आंबा, जांभूळ यांच्या पासून तर 2016 पासून पालघरच्या बोर्डीनजिक आम्ही वायनरी उभी केली असून चिकू, आंबा, अननस, स्टारफ्रुटपासून वाईन आणि मीड तयार करीत आहोत. कोकणचा विचार केल्यास, येथे स्टारफ्रूट, फणस, कोकम, काजू, अननस, करवंद आदी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या फळांना प्रतिकिलोचा दर आणि बाजारातील मागणी पाहता उत्पादन चांगले येऊनही शतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही. शिवाय मोठ्या प्रमाणात फळं वाया जातात. द्राक्षा व्यतिरिक्त अन्य फळांच्या वाईनला उत्पादन शुल्क माफ नसल्याने संधी असूनही या उदयोगाकडे वळायची कोणाची हिम्मत होत नव्हती. मात्र या निर्णयाचा चांगला परिणाम होऊन नवीन उद्योजक निर्माण होतील हे नक्की.

पर्यटन आणि शेती व्यवसायावर कोणता परिणाम होईल?
सध्या चिकूचा विचार केल्यास प्रति किलोचा दर खूपच कमी असून हमी भाव नसल्याने उत्पादन खर्चही परवडत नाही. कोकणातील हापूस वगळता सर्व फळपिकांची स्थिती सारखीच आहे. त्यामुळे शेतकºयांच्या पिकाला वाईन उद्योगामुळे चांगला भाव मिळेल. मधुमक्षिका पालन वाढेल. शिवाय परदेशात वाईन टुरिझम चांगल्या प्रकारे नावारूपाला आले आहे. आमच्या वायनरीला भेट देणाºया पर्यटकांची संख्या सुखावणारी असल्याने या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना मिळेल.

Web Title: Palghar and Konkan tourism development in a big way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.