Palghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 09:01 AM2018-05-28T09:01:50+5:302018-05-28T09:13:28+5:30
पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी अशी लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र भाजपा आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
पालघर पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना आमिष दाखवत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली, अशीही माहिती त्यांनी दिली.
(Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड)
''भाजपा रडीचा डाव खेळत आहे. बहुजन विकास आघाडीचे जिथे वर्चस्व आहे, त्याच भागात EVM बंद कसे सुरू नाहीत'', असा सवाल उपस्थित करत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपा साम-दाम-दंड-भेदचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान,''मतदानाची वेळ दोन तासाने वाढवून द्यावी'', अशी मागणीही हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
दरम्यान, श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत आहे.
#PalgharLoksabhabyelection: People outside a polling booth in Palghar pic.twitter.com/sdbOYadeHj
— ANI (@ANI) May 28, 2018