Palghar bypoll 2018 : ...म्हणून पालघर निवडणुकीत मधल्या बोटावर लावली जाते शाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 01:35 PM2018-05-28T13:35:26+5:302018-05-28T18:10:33+5:30

साधारणतः मधले बोटे दाखवले तर त्याचा वाईट अर्थ मानला जातो. मात्र पालघरमधील नागरिक अभिमानानं आपले मधले बोट दाखवत आहेत.

Palghar bypoll 2018: why voter showing middle finger | Palghar bypoll 2018 : ...म्हणून पालघर निवडणुकीत मधल्या बोटावर लावली जाते शाई

Palghar bypoll 2018 : ...म्हणून पालघर निवडणुकीत मधल्या बोटावर लावली जाते शाई

Next

पालघर - साधारणतः मधले बोटे दाखवले तर त्याचा वाईट अर्थ मानला जातो. मात्र पालघरमधील नागरिक अभिमानानं आपले मधले बोट दाखवत आहेत. याचे कारण म्हणजे पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. याचदरम्यान,जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्याही निवडणुका आहेत. ग्रामपंचायत आणि लोकसभेसाठी मतदान करणाऱ्या मतदारांची ओळख पटावी यासाठी लोकसभेसाठी मतदान केलेल्या मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, हे काही पहिल्यांदाच घडले आहे असे अजिबात नाही. यापूर्वी दोन वेगळ्या निवडणुकांसाठी एकाच दिवशी मतदान करावे लागल्यास असाच आदेश आयोगाकडून देण्यात आलेला आहे.

(Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा)






Web Title: Palghar bypoll 2018: why voter showing middle finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.