पालघर किनारपट्टीलगत संशयास्पद बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:48 AM2019-05-30T05:48:06+5:302019-05-30T05:48:12+5:30

श्रीलंकेत सीरिअल बॉम्ब स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारी बोट, सध्या पालघर किनारपट्टीलगतच्या समुद्रात वावरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिल्याने किना-यावरील पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

Palghar coastline suspicious boat | पालघर किनारपट्टीलगत संशयास्पद बोट

पालघर किनारपट्टीलगत संशयास्पद बोट

Next

पालघर : श्रीलंकेत सीरिअल बॉम्ब स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारी बोट, सध्या पालघर किनारपट्टीलगतच्या समुद्रात वावरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिल्याने किना-यावरील पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. अन्नधान्य आणि इंधनाचा मोठा साठा असलेली ही बोट अरबी समुद्रात निदर्शनास आल्याने किनारपट्टीवरील सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात इंटेलिजन्स ब्युरो, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवादी विरोधी पथक, कोस्टगार्ड, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सर्व सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र पोलिसांना किनाºयापासून १२ नॉटिकलपर्यंतच्या समुद्रातील भागात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सागरी पोलिसांनी आपल्याजवळील चार स्पीडबोटींद्वारे पेट्रोलिंगला जावे, असा आदेश देऊन जनतेत जागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले. संरक्षण यंत्रणेने दिलेल्या इशाºयानंतर पालघर पोलीसही सतर्क झाले आहेत. किनारपट्टीवरील संशयास्पद हालचाली टिपून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. पोलिसांनी अशा संशयित कारवाया रोखण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली असली, तरी अपुरे मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसामुग्री यामुळे पोलिसांना काही मर्यादा येत आहेत.
>समुद्रात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दक्षिण केरळमध्ये पेट्रोलिंग सुरू असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अधिक माहिती देऊ शकत नाही.
- कमांडन्ट विनिष कृष्णन, चीफ पीआरओ कोस्ट गार्ड मुंबई.

Web Title: Palghar coastline suspicious boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.