"सत्तेसाठी पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिला"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:19 AM2019-03-04T06:19:56+5:302019-03-04T06:20:13+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांत पालघर जिल्ह्यात भाजपाच मोठा भाऊ होता. खासदारही आपला होता.

"Palghar constituency gives power to Shiv Sena" | "सत्तेसाठी पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिला"

"सत्तेसाठी पालघर मतदारसंघ शिवसेनेला दिला"

Next

पालघर : स्थानिक स्वराज्य संस्थांत पालघर जिल्ह्यात भाजपाच मोठा भाऊ होता. खासदारही आपला होता. दोन आमदार होते, तरीही पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिल्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला असता केंद्रातील सत्तेसाठी हे पाऊल उचलल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीत माझ्यासह आपण सर्वांनी सगळी ताकद पणाला लावली, तरी गावित यांना मिळालेले मताधिक्य खूपच कमी होते. केंद्रात भाजपाचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे एखादा मतदारसंघ आपल्याकडे की शिवसेनेकडे हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याऐवजी जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालघरचा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता युती घडवून आणणे महत्त्वाचे होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: "Palghar constituency gives power to Shiv Sena"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.