पालघर, डहाणू , बोईसर, विक्रमगडला बंद १००%, सर्व पक्षांचा एकमुखी पाठिंबा, वाडा, तलासरी, वसई-विरारमध्ये बंदला प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:10 AM2017-09-19T03:10:29+5:302017-09-19T03:10:30+5:30

सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार,मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याच्या निषेधार्थ व हे पाणी जिल्ह्यासाठीच वापरण्याच्या मागणीसाठी सर्व पक्ष आणि संघंटनांनी पुकारलेल्या सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला पालघर, डहाणू, बोईसर, सफाळे, विक्रमगड, मनोर याच परिसरात दणदणीत प्रतिसाद लाभला

Palghar, Dahanu, Boisar, Vikramgad close to 100%, unanimous support for all the parties, Wada, Talasari, Vasai-Virar is not closed | पालघर, डहाणू , बोईसर, विक्रमगडला बंद १००%, सर्व पक्षांचा एकमुखी पाठिंबा, वाडा, तलासरी, वसई-विरारमध्ये बंदला प्रतिसाद नाही

पालघर, डहाणू , बोईसर, विक्रमगडला बंद १००%, सर्व पक्षांचा एकमुखी पाठिंबा, वाडा, तलासरी, वसई-विरारमध्ये बंदला प्रतिसाद नाही

Next


सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार,मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याच्या निषेधार्थ व हे पाणी जिल्ह्यासाठीच वापरण्याच्या मागणीसाठी सर्व पक्ष आणि संघंटनांनी पुकारलेल्या सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला पालघर, डहाणू, बोईसर, सफाळे, विक्रमगड, मनोर याच परिसरात दणदणीत प्रतिसाद लाभला मात्र वसई विरार, वाडा, जव्हार मोखाडा, तलासरी येथे बंदचा कोणताही प्रभाव जाणवला नाही. बंद जरी सर्व पक्ष आणि संघटनांनी पुकारलेला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिथे या मुद्याचा संबंध नाही त्या तालुक्यात बंदची सक्ती न केल्यामुळे बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र बंदग्रस्त परिसरातील चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे हाल झालेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्रमगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गावागावातील, पाड्यापाड्यातील घराना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असताना एमएमआरडीए ला हाताशी धरून राजकीय मताच्या जोरावर वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे मिळविण्यात काही लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. भविष्यात त्याचा मोठा परिणाम तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनावर होणार असून लोकांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नसल्याची परिस्थिती उद्भवणार आहे.
आपले हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने सर्व पक्षीय पाठिंबा असलेल्या सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या आजच्या पालघर बंदला सकाळ पासूनच रिक्षा संघटनांनी सहभाग दर्शविला. एसटी ही हळूहळू बंद करण्यात आल्या. पालघर, सफाळे, बोईसर, डहाणू, मनोर, राष्ट्रीय महामार्गाचा काही भागात बंद ची तीव्रता अधिक जाणवत होती. दुकानदार व व्यापारी संघटना ह्या बंद मध्ये सहभागी झाल्याने सर्व दुकाने, बाजारपेठा ओस पडल्या होत्या.रिक्षा, एसटी सेवा बंद असल्याने औद्योगिक क्षेत्र, बँका, सरकारी कार्यालये ओस पडली होती.तर पालघर, बोईसर, सफाळे, केळवे, डहाणू रेल्वे स्टेशन परिसरात आज शुकशुकाटहोता.बंद ची तीव्रता पाहता रेल्वे स्टेशन,एसटी स्थानक, बाजारपेठा, इ. भागात दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
संध्याकाळी सूर्या पाणी बचाव समितीची सर्वपक्षीय बैठक पंचायत समिती पालघर सभागृहात पार पडली.ह्यावेळी समितीचे अध्यक्ष रमाकांत पाटील ह्यांनी शासनाने आदिवासी व भूमीपुत्रांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. अन्यथा हे आंदोलन पुढे अधिक तीव्र करण्याचा इशारा ह्यावेळी उपस्थित आमदार अमित घोडा,नगराध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे,माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, सभापती मनीषा पिंपळे, उपसभापती मेघन पाटील, भाजपचे मधुकर पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष केदार काळे, कुणबी सेनेचे जितेंद्र राऊळ, शेतकरी संघर्ष समितीचे संतोष पावडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, राष्ट्रवादीचे बाबा कदम, अनिल गावड, मनसेचे आशिष मेस्त्री इ.सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुने ह्यांच्या कडे निवेदन सुपूर्द केले.
।पाणी बचावसाठी टेन मनोरमध्ये कडकडीत बंद
मनोर : सूर्या धरणाचा पाणी पालघर जिल्हा ग्रामीण दुसºया ठिकाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी आज पाणीबचाव संघर्ष समितीच्या जिल्हा बंद ला टेन मनोर तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गवर हॉटेल्स दुकान रिक्षा व इतर वहाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र प्रवासी व इतरांचे हाल झाले. या बंद ला भूमिसेना, शिवसेना, काँग्रेस, कष्टकरी,व इतर पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता.
बंदला तलासरीत प्रतिसाद नाही
तलासरी : सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने सोमवारी दिलेल्या पालघर जिल्हा बंदला जिल्ह्यात काही तालुक्यात जबरदस्त प्रतिसाद मिळाला असला तरी तलासरीत मात्र या बंदला प्रतिसाद मिळाला नाही, सोमवारी येथील बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या, आठवडे बाजारही मोठ्या प्रमाणात भरला होता, माकपा नेही या बंदला ठराविक तालुक्यात पाठींबा दिलेला असला तरी मात्र माकपचे वर्चस्व असलेल्या तलासरी तालुक्यात बंदला जराही प्रतिसाद मिळाला नाही. कारण सूर्या धरणाच्या पाण्याच्या
प्रश्नाशी या तालुक्याचा तसा प्रत्यक्ष संबंध नव्हता. बंदमध्ये सहभाग नसला तरी या तालुक्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आवश्यक तेवढा बंदोबस्त तैनात केला होता.
परंतु जनजीवन सुरळीत असल्याचे पहाताच त्यातही काहीसे शैथिल्य आले होते.
।बंदला वसईत प्रतिसाद नाही
वसई : वसईला सूर्याचे पाणी देण्याच्या विरोधात पालघर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला वसई विरार परिसरात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उलट सूर्याचे वाया जात असलेले अतिरिक्त पाणी धुकटण येथे अडवून तिथून पाणी घेतले जात आहे. सूर्याचे पाणी थेट घेतले जात नसून सध्या सुरु असलेले राजकारण गलिच्छ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केला आहे.

सूर्या धरणाचे आठ गेट बंद करण्यासाठी तत्कालीन कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार आनंद ठाकूर यांनी अजित पवार यांच्यामार्फत एमएमआरडीए कडून १८६ कोटी वनखात्याला द्यावयास लावले. त्यामुळे धरणातील वाढलेले पाणी वसईकरांना पुरवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कुर्झे धरणातील वाया जात असलेल्या ८० टक्के पाण्याचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
।बोर्डीत बंदला प्रतिसाद नाही, आठवडे बाजार तुरळक
बोर्डी : सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीने सोमवारी पालघर जिल्हा बंदच्या हाकेला बोर्डी परिसरात प्रतिसाद लाभला नाही. या हा बंद सर्वपक्षीय असला तरी येथे दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पडले. दरम्यान एसटी सेवा सुरु असल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अडचण झाली नाही. गुजरात औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कामगारांना सोमवारी आठवड्याची सुट्टी असते.
डहाणू येथे आठवडा बाजार भरतो. मात्र बंदमुळे बाजार तुरळक होता. त्यामुळे दोन दिवसांनी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असल्याने विविध शृंगाराच्या वस्तू खरेदी करणार्यांच्या हिरमोड झाला. काही महिलांनी बाजार गाठला, परंतु विक्र ेत्यांची संख्याच कमी असल्याने रिकामी हाताने परतावे लागले. देवीचे मखर बनविण्यासाठी लागणाºया वस्तू बाजारातून खरेदी न करता आल्याने दुप्पट किंमत मोजावी लागणार असल्याची प्रतिक्रि या नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बंदचा दिवस शांततेत पार पडल्याबद्दल मात्र स्थानिकांनी व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. सणासुदीच्या काळात बंद टाळलेलेच बरे, अशी भावनाही अनेक ज्येष्ठांनी व्यक्त करून दाखविली.
।ग्रामीण भागात परिणाम नाही , आठवडे बाजार सुरु
पारोळ : सूर्या पाणी बचाव संघर्ष समतिीमार्फत पालघर जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आली होती. मात्र या बंदचा वसई तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागात कुठलाच परिणाम दिसून आला नाही. बस सेवा, शाळा, कॉलेज, यांच्यासह सर्वत्र रोजच्या सारखेच वातावरण होते. याचबरोबर येथील रिक्षा, इतर प्रवासी वाहने, खाजगी वाहने तसेच नागरिकांची वर्दळ नेहमीप्रमाणेच होती. काही नागरिकांना तर बंद आहे हेच मुळी माहिती नव्हते. येथे भरणारा खानिवडयाचा आठवडी बाजार हि नेहमीप्रमाणेच भरला होता. बंदचा बाजारावर कोणताच परिणाम दिसून आला नाही. एकंदरीत येथील सर्व व्यवहार सुरळीत होते.
।कासात बंद यशस्वी
कासा: सूर्या प्रकल्पाचे पाणी पालघर ग्रामीण जिल्हयाबाहेर वळविण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण पालघर जिल्हा बंदची हाक संघर्ष समितीने दिली होती. जिल्हयातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी यास पाठींबा दिला होता. सोमवारी सकाळपासून संघर्ष समितीचे कार्यकर्ते कासा सायवन नाका, चारोटी सूर्यानगर, कवडास तलवाडा आदि ठिकाणी जमा झाले होते,
>बोईसरला दणदणीत बंद
बोईसर : सूर्या प्रकल्पाचे पाणी पालघर ग्रामीण जिल्ह्याबाहेर वळविण्याचा निर्णय रदद् करण्याच्या मागणीसाठी पुकारलेला पालघर जिल्हा बंद मधे बोईसर च्या सर्व व्यापारी, रिक्षा, हॉटेल्स,दुकानदार व व्यावसायिक सहभागी होऊन बंद १०० टक्के यशस्वी केला. सूर्या पाणी बचाव समिती व सर्व मुख्य पक्ष व संघटनातर्फे बंद आवाहन केले होते.
शाळा, मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये, आणि बँका, विमा कार्यालये ,आणि एसटी सुरु होत्या तर तारापूर औद्योगिक क्षेत्रात जाणाºया कामगारांचे व विद्यार्थ्यांचे रिक्शा, एसटी बंदमुळे हाल झाले तर कमी उपस्थिती अभावी काही उद्योगातील उत्पादनावर परिणाम झाला
सकाळी शिवसेनेचे प्रभाकर राऊळ, नीलम संखे ,मुकेश पाटील भारतीय जनता पार्टीचे महावीर जैन, अशोक वडे, अंकुर राऊत ,आशिष संखे, नितीन राऊळ, प्रणय म्हात्रे, काँग्रेसचे चंद्रकांत जाधव, शेतकरी संघर्ष समितीचे संतोष पावडे, निर्धार संघटनेचे कुंदन संखे, शिवशिक्त संघटनेचे अतुल देसाई, आरपीआयचे सचिन लोखंडे, मनसे समीर मोरे, चेतन संखे यांचे सह विविध पक्ष व संघटनेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिक रस्त्यावर बंद यशस्वी करण्यासाठी उतरले होते.
>डहाणू वाणगावमध्ये कडकडीत बंद
डहाणू : पालघर जिल्यात डहाणू पालघर तलासरी विक्र मगड या तालुक्यांसाठी सिंचन आणी पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या सुर्या प्रकल्पाचे पाणी मीरा भार्इंदर आणि वसई विरार या शहरी भागाकडे वळण्याच्या सरकारी निर्णयाचा निषेध करण्यासाठी भूमिपुत्रांनी आज डहाणू

Web Title: Palghar, Dahanu, Boisar, Vikramgad close to 100%, unanimous support for all the parties, Wada, Talasari, Vasai-Virar is not closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.