पालघर जिल्ह्यात ६८९१ परीक्षार्थींनी दिली सीईटी
By admin | Published: May 6, 2016 01:07 AM2016-05-06T01:07:01+5:302016-05-06T01:07:01+5:30
आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात एमएचटी व सीईटीच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रावर परीक्षेस बसणाऱ्या ७३७७ विद्यार्थ्यांपैकी ४८६ विद्यार्थी भौतिकशास्त्र
पालघर/नंडोरे : आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात एमएचटी व सीईटीच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रावर परीक्षेस बसणाऱ्या ७३७७ विद्यार्थ्यांपैकी ४८६ विद्यार्थी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित अशा तीन विषयाच्या परीक्षेस गैरहजर राहिले असून ६८९१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या रसायनशास्त्र या विषयासाठी आज सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेस जिल्ह्यातील ७३७७ विद्यार्थ्यांपैकी पालघरमधील १० केंद्रावर ४२८३ विद्यार्थी परीक्षेस बसले तर ७६ विद्यार्थी गैरहजर राहिले. बोईसरमधील केंद्रावर ३०१० विद्यार्थ्यांपैकी २९२९ विद्यार्थी परीक्षेस हजर होते. तर ८९ विद्यार्थी गैरहजर होते. जीवशास्त्र विषयाच्या दुपारच्या वेळच्या परीक्षेस पालघरमधील १० केंद्रावर ४५१५ पैकी ४४२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर ११३ विद्यार्थी गैरहजर होते. बोईसरमधील सात केंद्रातून २२५३ विद्यार्थी परीक्षेस हजर होते. तर ७६ विद्यार्थी गैरहजर होते. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या गणित विषयाच्या परीक्षेसाठी पालघरमधील १० केंद्रातून ४९६९ विद्यार्थ्यांपैकी ४८५८ परीक्षार्थी परीक्षेस उपस्थित असून ११५ परीक्षार्थी गैरहजर राहिले. बोईसरमध्ये ७ केंद्रावर प्रत्यक्षात ७२१ विद्यार्थी परीक्षेस बसणार होते. पण ७०४ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. १७ विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती परीक्षेचे परीक्षा संपर्क अधिकारी जे जे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिली. (वार्ताहर)