पालघर जिल्ह्यात मुलींनीच मारली बाजी, वसई तालुका टॉपर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:49 AM2018-06-09T02:49:29+5:302018-06-09T02:49:29+5:30

मुंबई विभागीय मंडळाने घेतलेल्या १० वीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण संख्येत मुले अधिक असलीतरी गुणवत्तेत मुली आघाडीवर आहेत.

In Palghar district, girls killed, Vasai taluka topper! | पालघर जिल्ह्यात मुलींनीच मारली बाजी, वसई तालुका टॉपर!

पालघर जिल्ह्यात मुलींनीच मारली बाजी, वसई तालुका टॉपर!

Next

पालघर : मुंबई विभागीय मंडळाने घेतलेल्या १० वीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण संख्येत मुले अधिक असलीतरी गुणवत्तेत मुली आघाडीवर आहेत. ५२,५८३ पैकी उत्तीर्ण मुलांचे प्रमाण २५०७० एवढे आहे तर मुलींचे प्रमाण २२११२ आहे. तर एकूण उत्तीर्णाचे प्रमाण ४७१८२ आहे. गुणवत्तेमध्ये मात्र मुलींची टक्केवारी ९०.६३ तर मुलांची टक्केवारी ८८.९५ आहे.
एकूण २८३३४ मुले व २४४७१ मुली असे एकूण ५२५८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. वसई तालुक्यातून २५०१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक ९३.४२ आहे. त्या खालोखाल मोखाडा तालुक्याचा निकाल लागला आहे. तेथे १२४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९०.८६ टक्के आहे. त्या खालोखाल पालघर तालुक्याचा निकाल असून येथे ६९७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९०.६५ आहे.
जव्हार तालुक्यातील १८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाली असून निकालाची टक्केवारी ८९.०४ आहे. डहाणू तालुक्यातील ४५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ८५.११ आहे.
वाडा तालुक्यातील २६४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८३.४९ आहे. विक्रमगड तालुक्यातील २१७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८१.१५ आहे. तलासरी तालुक्यातील २७४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७८.६५ आहे. टक्केवारीत वसई तालुका प्रथम तर तलासरी सर्वात मागे आहे.


तारापूर, बोईसर मधील शाळांनी राखली उत्तम निकालाची परंपरा
तारापूर च्या रा.ही.सावे विद्यालयाचा-निकाल 88.44 त्न लागला असून श्रेया सुभाने 94.60 टक्के गुण मिळवून प्रथम तर प्रणव नरेश किणी (92.40टक्के ) द्वितीय, सानिका पाटील (91.20टक्के ) गुण मिळवून तृतीय आली आहे. डॉन बॉस्को स्कूल (बोईसर) शाळेचा निकाल 98.67टक्के लागला असून रितु रंजन 96.40टक्के गुण मिळून प्रथम तर रिद्धी पिंपळे आणि साक्षी भुताले ( 96.20टक्के) या दोन्ही विद्यार्थी द्वितीय तर वर्षा कुशवाह (94.80टक्के ) ही विद्यार्थीनी तृतीय आली आहे. डॉ.स.दा.वर्तक विद्यालय बोईसर, मराठी माध्यमाचा निकाल 95.55 टक्के लागला असून पायल नाद्रे ही विद्यार्थीनी 95.20 टक्के गुण मिळवून प्रथम द्वितीय वैष्णवी संखे (94.40टक्के ) तर अजिंक्य भटेसिंग राजपूत (93.80 टक्के ) तृतीय आला आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या शाळेने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तर याच शाळेच्या हिन्दी माध्यमा चा 96.92 टक्के निकाल लागला असून संजना खत्री 91.20टक्के गुण मिळवून प्रथम अनु महतो (90.80टक्के ) द्वितीय तर पूजा अवधेश यादव ( 90.60टक्के ) मिळवून तृतीय आली आहे त्याचप्रमाणे याच शाळेचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 95.34 टक्के लागला असून अतुल ठाकूर 88.20 टक्के गुण मिळवून प्रथम, तर मृणाल कोळेकर (87.40टक्के) द्वितीय , भावी मेस्त्री ( 83.00टक्के) तृतीय आली आहे. ग्रामीण विद्यालय, नावझे या शाळेचा निकाल 97.73 त्न लागला आहे.

वाडा तालुक्याचा 87.67 टक्के निकाल
वाडा : वाडा तालुक्याचा निकाल 87.67 टक्के लागला आहे. परिक्षेस 3 हजार 173 विद्यार्थी बसले होते.त्यापैकी 2 हजार 649 इतके विद्यार्थी पास झाले. ह.वि.पाटील विद्यालय चिंचघर 81.94 टक्के निकाल लागला आहे.आंबिस्ते हायस्कूल 92 टक्के, आ. ल. चंदावरकर हायस्कूल खानिवली 86.80, ग्रामीण विद्यालय असनस 93.20, कंचाड हायस्कूल 97.59, शारदा विद्यालय नेहरोली 66.62, देवघर विद्यालय 94. 43, पी. जे. हायस्कूल 84.35, स्वामी विवेकानंद विद्यालय74. 54,सोनाळे इंग्लिश स्कूल 84, गो-हे विद्यामंदिर 93. 52, बा. ल. शिंगडा विद्यालय पोशेरी 92, आश्रमशाळा पाली 94. 28 असा निकाल आहे.

कासा भागातील शाळांचा निकाल समाधानकारक
कासा : येथील आचार्य भिसे विद्यालयाचा निकाल 80.36 लागला आहे यामध्ये प्रथम प्रीती बळीराम शिंदे 94.80 टक्के द्वितीय स्नेहल पांडुरंग जगदाळे 92.40 तर तृतीय अभिषेक रावसाहेब जाधव 87.80 टक्के तर के जे सोमय्या हायस्कूल नरेशवाडी शाळेचा निकाल 90.47 टक्के लागला आहे। ज म ठाकूर हायस्कूल वाणगावं शाळेचा निकाल 80.83टक्के लागला असून 433 पैकी 350 विद्यार्थी पास झाले असून नेन्सी कन्हैयालाल जैन 95 टक्के मिळवून प्रथम आली आहे. तर जोयल अरु ण माच्छी 91.5 टक्के मिळवून द्वितीय आली आहे. तर विद्या विनोद अधिकारी हायस्कूल लालोंडेचा 100 टक्के लागला.

जव्हार २५ पैकी ५ शाळांचा निकाल १०० टक्के
जव्हार : तालुक्यातील २५ शाळांपैकी ५ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. आदिवासी विद्यार्थी असलेल्या भारती विद्यापीठ हायस्कूल जव्हार, वडोली देहरे हायस्कूल, वडोली, श्री जयेश्वर विद्यालय डेंगाचीमेट, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, जव्हार व एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा हिरडपाडा या शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. मात्र यंदा तालुक्यात ९० ते ९९ टक्के मधील १० शाळांचा तर ८० टक्के ते ९०टक्के मधील ७ शाळांचा समावेश असुन मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल पाच टक्क्यांनी वाढला आहे.

वसईत दहावीच्या परीक्षेचा निकाल ९३.४२ टक्के
पारोळ : राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च/एप्रिल २०१८ घेतलेल्या दहावी च्या परीक्षेचा निकाल वसई तालुक्यात ९३.४२ टक्के लागला वसईतून एकुण २५ हजार १२ परीक्षार्थी पास झाले. २५० शाळा मधून २६ हजार ७७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकालात १३ हजार ४१७ मुले पास झाली असून ११ हजार मुलीनी या परीक्षेत बाजी मारली. निकालाच्या दिवशी शुक्र वार आल्याने व याच दिवशी वीज पुरवठा त्यांच्या कामांसाठी खंडित होत असल्याने सायबर बंद असल्याने निकाल हाती घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली तर अनेक मुलांनी मोबाइलवर गुणपत्रिका बघितल्या.

विक्रमगड तालुक्याचा निकाल 81.14 टक्के
विकमगड : तालुक्याचा निकाल 81.14टक्के लागला आहे यामध्ये भारती विद्यापीठ विक्रमगड यांच्या निकाल शंभर टक्के लागला असून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा निकाल ही शंभर टक्के लागला आहे तालुक्यातविकमगड हायस्कूल 73.29, मलवाडा हायस्कूल 77.96, आलोंडा हायस्कूल 71.80, भोपोली हायस्कूल 95.98, अरविंद आश्रम शाळा 93.93, वाकी हायस्कूल 96.47, कावळे आश्रम शाळा 95.00, साखरे आश्रम शाळा 96.49 कुझँ हायस्कूल 80.18 केव हायस्कूल92.03, माण 86.88 आदर्श हायस्कूल 81.15 कहे आश्रम 97.56 शाळेचा निकाल जाहिर झाला.

डहाणू तालुक्याचा निकाल 85.10 टक्के
डहाणू/बोर्डी : या तालुक्याचा निकाल 85.10 टक्के लागला आहे. तर पाच शाळांनी निकाल शंभरटक्के लावण्याची किमया केली आहे. पारनाका येथील के.एल.पोंदा हायस्कूलची ईशा बाळकृष्ण देठे या मराठी माध्यमातील विद्यार्थिनीला 96 टक्के गुण मिळाले आहेत. तिची आई गृहिणी असून वडील अकाउंटंट आहे. तर शिरीनदीनियार हायस्कूल, व्ही. एम. ठाकूर हायस्कुल वाणगाव, एच. एम. पारेख हायस्कूल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सावटा आणि शासकीय आश्रमशाळा धामणगाव या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

सरपंच, उपसरपंचाचे यश
जव्हार : तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या वावर वांगणी या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच हे दोघेही एस.एस.सी १० वी. परीक्षा पास झाले आहेत. १० वीच्या परीक्षेला बसलेले हे दोघेही बहिस्थ विद्यार्थी होते. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षण असेल तर आपल्या ग्रामपंचायतीचा विकास सहज करू शकतो. या दृष्टीकोनातून परीक्षेला बसलेल्या सरपंच तारा विजय शिंदे यांना ७१ टक्के आणि उपसरपंच यशवंत रतन बुधर यांना ६१.२० टक्के असे गुण मिळाले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी घरी अभ्यास करून यश मिळविले आहे. या दोघांचेही जेमतेम ८ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र त्यांच्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले. आम्ही १० वीच्या परीक्षेत पास झालो आहे. याचा आम्हला आनंद आहे. सरपंच व उपसरपंच यांच्यावर वावर वांगणी ग्रामपंचयातीकडून आणि तालुक्यातून तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बोईसर : अनेक शाळांचा निकाल 100%
बोईसर : परिसरातील बहुसंख्य शाळांचा शंभर व शंभर टक्केच्या आसपास निकाल लागला असून अनेक शाळांमध्ये पहिल्या तीन मध्ये मुलींनीच बाजी मारून शिखर गाठले आहे. बोईसर पूर्वेकडील अत्यंत ग्रामीण भागातील लालोंडे (नागझरी) येथील स्व.सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून या शाळेने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या शाळेत भक्ती पाटील ही विद्यार्थीनी 94.20 त्न गुण मिळवून प्रथम आली असून आर्या पाटील व संकेत घरत( 93.60टक्के) द्वितीय, तर ओमकार घरत व भाग्यश्री मंजुळकर (93.00टक्के) हे तृतीय आले आहेत. बोईसर मिलिट्री स्कूल, (पास्थळनाका-बोईसर) (मराठीमाध्यम) शाळेचा निकाल 100 त्न लागला असून धृतिका कोठारी 91.80 त्न गुण मिळवून प्रथम तसेच प्रतीक्षा नवघणे (90.60त्न) द्वितीय, तर कुंदन कदम (90.40त्न) तृतीय आला आहे.
तारापूरच्या मोहम्मदी उर्दू हायस्कूल या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून शाहीन कौसर अकबर शेख हा विद्यार्थी 93.80 त्न गुण मिळवून प्रथम तर महेक बानू रफीक मेमन ( 91.20टक्के) द्वितीय आली आहे. म.आय.डी.सी. तील तारापूर विद्या मंदिर शाळेचानिकाल 100 त्न लागला असून सॅन्ड्रा थाय्यील 95.80 त्न गुण मिळवून प्रथम, श्रुती नायर ( 95.20टक्के) द्वितीय तर तृतीय क्र मांक 93.40 टक्के गुण मिळवून सुमंत ठाकुर व श्रेयस डोंब हे दोघे विद्यार्थी आले आहेत.

जुळ्या बहिणींचे अनोखे यश
वसई : शालांत परिक्षेत नालासोपाऱ्यातील आकांशा आणि अक्षता चंदन ठाकुर या जुळ्या बहिणींनी 94 टक्के मिळवून दुसरा आणि तिसरा क्र मांक पटकावला.
जुळ्या असल्यामुळे त्यांचे दिसण्यातच नव्हे तर अभ्यास आणि इतर कामांमध्येही बºयापैकी साम्य आहे. नानभाट येथील होलीक्र ॉस शाळेतून यंदाच्या दहावीत शिक्षण घेणाºया आकांक्षाने 94.20 तर

Web Title: In Palghar district, girls killed, Vasai taluka topper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.