पालघर जिल्ह्यात ९७ हजार परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:40 AM2018-02-21T00:40:50+5:302018-02-21T00:40:54+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा येत्या १ मार्चपासून सुरु होणार असून १२ वीच्या

Palghar district has 97 thousand candidates | पालघर जिल्ह्यात ९७ हजार परीक्षार्थी

पालघर जिल्ह्यात ९७ हजार परीक्षार्थी

Next

हितेन नाईक
पालघर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षा येत्या १ मार्चपासून सुरु होणार असून १२ वीच्या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून ३८ परीक्षा केंद्रातून सुमारे ३९ हजार ०६३ विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षेला ९८ केंद्रातून सुमारे ५८ हजार २६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत १२ वीची तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे. या सुरळीत व्हाव्यात या साठी शिक्षण विभाग सज्ज झाला असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ शाळांमधील परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील हिरवे मोखाडा, करेगाव मोखाडा, विनवळ मोखाडा, पालघर तालुक्यातील आगरवाडी, वसई तालुक्यातील ज्ञानोदय नालासोपारा तर जव्हार तालुक्यातील दाभोसा या परीक्षा केंद्रांना संवेदनशील केंद्रे म्हणून शिक्षण विभागाने घोषित केले आहे. या परीक्षा केंद्रावर दोन भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३८ केंद्रातून ३९ हजार ०६३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तिची जिल्ह्यातील सर्वाधिक २० केंद्रे वसई तालुक्यात आहेत. सुमारे २०,७०६ विद्यार्थी आहेत. वाडा तालुक्यातील ३ केंद्रातून २ हजार ९३६ , मोखाड्याच्या ३ केंद्रातून १ हजार १०३ , विक्रमगड मधील २ केंद्रातून १ हजार ५५७, जव्हारच्या १ केंद्रातून १ हजार २१२, तलासरीच्या ३ केंद्रातून १ हजार ९६९ , डहाणू येथील ४ केंद्रातून ३ हजार २१२, पालघरच्या २ केंद्रातून ६ हजार ३६९, अशा ३८ केंद्रातून ३९ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
दहावी परीक्षेला जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ९८ केंद्रातून ५८ हजार २६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वाधिक वसई तालुक्यात असून ४९ केंद्रातून २९ हजार ६७२ परीक्षा देणार आहेत. तर वाडा तालुक्यातील ६ केंद्रातून ३ हजार ४८०, मोखाडा तालुक्यातील ४ केंद्रातून १ हजार ५७२, विक्रमगड तालुक्यातील ६ केंद्रातून २ हजार ७२५, जव्हार तालुक्यातील ४ केंद्रातून २ हजार २२७ , तलासरी तालुक्यातील ५ केंद्रातून ४ हजार ४५५ , डहाणू तालुक्यातील ९ केंद्रातील ५ हजार ६८५, पालघर तालुक्यातील १५ केंद्रातील ८ हजार ४५२ परीक्षा देतील.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र जवळ असावे म्हणून जिल्हयात बारावीची चार तर दहावीची बारा नवीन केंद्रे या वर्षांपासून सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त परीक्षा द्यावी. तसेच काही अडचणी उद्भवल्यास मंडळाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी केले आहे.

अशी असेल जिल्ह्यातील चोख व्यवस्था
प्रत्येक परीक्षा केंद्रात एक संचालक नियुक्त करण्यात आला असून सुमारे २५ विद्यार्थ्यांमागे एक पर्यवेक्षक तसेच केंद्रावर एक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका संचांसाठी जिल्ह्यात १२ कस्टडी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात १ तर पालघर व वसई तालुक्यात प्रत्येकी दोन कस्टडी चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची दोन भरारी पथके तयार करण्यात आली असून त्यात सुमारे आठ जणांचा ताफा समाविष्ट करण्यात आलेला आहे.

Web Title: Palghar district has 97 thousand candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.