गणरायाच्या आगमनासाठी पालघर जिल्हा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 10:53 PM2019-08-31T22:53:16+5:302019-08-31T22:53:20+5:30

१५१४ अधिकारी तैनात । २,७१९ सार्वजनिक, ४०५४५ खाजगी बाप्पांची होणार स्थापना

Palghar District ready for Republic arrival | गणरायाच्या आगमनासाठी पालघर जिल्हा सज्ज

गणरायाच्या आगमनासाठी पालघर जिल्हा सज्ज

Next

पालघर : जिल्ह्यात एकूण २ हजार ७१९ सार्वजनिक ४० हजार ५२५ खाजगी गणपती मुर्त्यांची सोमवारी स्थापना होणार असून २१२ सार्वजनिक गौरी व ३ हजार १४८ ठिकाणी खाजगी गौरींची स्थापना होणार आहे. सोमवार पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून पोलीस अधिक्षकासह १ हजार ५१४ अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू होणार असून पाकिस्तानी आतंकवादी समुद्रमार्गे भारतात प्रवेश करू इच्छित असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणेने दिला आहे. त्या पाशर््वभूमीवर हा उत्सव शांततेत पार पडावा संशयास्पद व्यक्ती व त्यांच्या हालचालीकडे पूर्णत: लक्ष देऊन त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहेत. पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, वाडा असे आठ तालुके असून या आठ तालुक्यात एकूण 2719 सार्वजनिक तर चाळीस हजार 525 खाजगी गणपतींची स्थापना करण्यात येणार आहे 212 सार्वजनिक गौरी व 3148 ठिकाणी खाजगी गौरींची स्थापनाही करण्यात येणार आहे या उत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अपर पोलीस अधीक्षक सात उपविभागीय पोलिस अधिकारी १११ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक 1394 पोलीस उपनिरीक्षक कॉन्स्टेबल पोलीस नाईक तसेच एक एस आर पी कंपनी आरसीपी व क्यू आर टी ची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत त्यांच्या मदतीसाठी 500 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी व सर्व उपविभागीय अधिकारी यांची यांची गणेशोत्सव या सणाच्या अनुषंगाने बैठक घेऊन योग्य त्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत कोणत्याही आव्हानात्मक कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळणी करता यावी यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये राखीव पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर अश्रू धुराची नळकांडी, हेल्मेट लाठ्या आदी साधनांसह अधिकारी कर्मचारी वर्ग तैनात ठेवण्यात आलेला आहे. पोलीस दल 24 तास साठी सज्ज ठेवण्यात आलेले आहे.
प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर स्थिती काबूत ठेवण्यासाठी योजना राबविण्यात येत असून पोलिस ठाणे हद्दीत पायी गस्त प्रभावीपणे राबविण्यात येत आहे अवैध दारु अमली पदार्थ जुगार धंदे आदींचे उच्चाटन करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे पोलीस ठाणे अंतर्गत रेकॉर्डवर असणारे गुन्हेगार तसेच अवैध धंदे करणारे आदींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असून त्यांच्या हालचालींवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत आहे पोलिस मुख्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगल नियंत्रण पथक ठेवण्यात आलेले असून कायदा व सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी पालघर पोलीस सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले .या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस नियंत्रण कक्ष पालघर च्या क्र मांक 8669604100, 9730711119, 9730811119वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भक्तांना पोलिसांचे आवाहन
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शक्य तेवढ्या लवकर आपली मूर्ती मंडपात न्यावी, मिरवणूक कुठेही जास्त काळ रेंगाळणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीत डीजे सारख्या ध्वनी प्रदूषण करणाºया यंत्रणा वापरू नयेत. तसेच गुलाल वा तत्सम बाबींचा वापर काळजीपूर्वक व जपून करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मिरवणूक काढतांना व पुढे नेतांना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही अशा रितीने ती एका बाजूने न्यावी तसेच मंडपाकडे मूर्ती नेण्यासाठी शक्य तेव्हा जवळचा मार्ग निवडावा मंडळांनी मूर्ती नेण्यासाठी पहाटेचे निवडल्यास अधिक उत्तम. अशी सुचनाही पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

Web Title: Palghar District ready for Republic arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.