पालघर जिल्ह्याचा निकाल ९३.५७ टक्के
By Admin | Published: June 14, 2017 02:50 AM2017-06-14T02:50:45+5:302017-06-14T02:50:45+5:30
पालघर जिल्ह्याचा दहावी चा निकाल ८९.६० टक्के लागला असून आठ तालुक्यातील ४९९ शाळा मधून ५० हजार ३४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील २४ हजार
- हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर जिल्ह्याचा दहावी चा निकाल ८९.६० टक्के लागला असून आठ तालुक्यातील ४९९ शाळा मधून ५० हजार ३४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील २४ हजार ८३ विद्यार्थी तर २१ हजार २५ विद्यार्थिनी असे एकूण ४५ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३.५७ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी निकालात विद्यार्थ्यांवर निसटती बाजी मारली आहे.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ५० हजार ५१६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी आपले अर्ज भरले होते.मात्र
प्रत्यक्षात २७ हजार ३२ विद्यार्थी तर २३ हजार ३११ विद्यार्थिनी अश्या एकूण ५० हजार ३४३ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. १७३ विद्यार्थी अनुपस्थित होते.
वाडा तालुक्यात ३२ शाळा मधून १ हजार ८०१ विद्यार्थी तर १ हजार ५०० विद्यार्थिनी असे एकूण ३ हजार ३०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १ हजार ५६२ विद्यार्थी तर १ हजार ३३२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा एकूण निकाल ८७.६७ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी बाजी मारली.
मोखाडा तालुक्यातील १८ शाळा मधून ७३८ विद्यार्थी तर ५८७ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या अशा एकूण १ हजार ३२५ विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या त्यातून ५४७ विद्यार्थी तर ४४० विद्यार्थी असे एकुण ९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ७४.४९ टक्के इतका लागला असून विद्याथीनींनी तालुक्यात बाजी मारली आहे.
विक्रमगड तालुक्यातील २४ शाळांमधून १ हजार ३७४ विद्यार्थी तर १ हजार २३७ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार २२७ विद्यार्थी तर १ हजार ७५ विद्यार्थ्यांनी असे एकूण २ हजार ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८८.१७ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
जव्हार तालुक्यातील २५ शाळांमधून १ हजार ९० विद्यार्थी तर १ हजार १७ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार १०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ९७८ विद्यार्थी तर ८४४ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ८२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८६.४७ टक्के लागला असून या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
तलासरी तालुक्यातील ३१ शाळांमधून १ हजार ७३३ विद्यार्थी तर १ हजार ४६४ विद्यार्थिनी असे एकूण ३ हजार १९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १ हजार ३११ विद्यार्थी तर १ हजार १३० विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ७६.३५ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.
डहाणू तालुक्यातील ४८ शाळांमधून २ हजार ७६१ विद्यार्थी तर २ हजार ३७९ विद्यार्थिनी असे एकूण ५ हजार १४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी २ हजार ३५९ विद्यार्थी तर २ हजार ३१ विद्यार्थिनी असे एकूण ४ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८५.४१ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
पालघर तालुक्यातील ८१ शाळांमधून ३ हजार ९९२ विद्यार्थी तर ३ हजार ४७८ विद्यार्थिनी असे एकूण ७ हजार ४७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ३ हजार ५५८ विद्यार्थी तर ३ हजार १४१ विद्यार्थिनी असे एकूण ६ हजार ६९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८९.६८ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.
वसई तालुक्यात सर्वाधिक २४० शाळांमधून १३ हजार ५४३ विद्यार्थी तर ११ हजार ६४९ विद्यार्थिनी असे
एकूण २५ हजार १९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १२ हजार ५४१ विद्यार्थी तर ११ हजार ३२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.