पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:17 AM2018-05-31T00:17:31+5:302018-05-31T00:17:31+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा पालघरचा निकाल ८६.७० टक्के लागला असून यामध्ये मुलीनी ९० टक्के गुण मिळवून मुलांवर (८४.०१ टक्के) बाजी मारली आहे.

Palghar district results in 86.70 percent | पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के

पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के

Next

पालघर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा पालघरचा निकाल ८६.७० टक्के लागला असून यामध्ये मुलीनी ९० टक्के गुण मिळवून मुलांवर (८४.०१ टक्के) बाजी मारली आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यातून ३९ हजार ४७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी ३३ हजार ८४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले वसईचा निकाल सर्वाधिक ८८.७८ टक्के तर सर्वात कमी निकाल मोखाड्याचा ७४.९० टक्के लागला. वाडा तालुक्याचा निकाल ८६.२५, विक्रमगड ८०.५३, जव्हार ७६.२८, तलासरी ८८.४४, डहाणू ८५.०५, पालघर ८५.५४ आणि लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९३.७३ टक्के, कला शाखेचा निकाल ७७.५५ टक्के, आणि वाणिज्य शाखेचा ८७.८२ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ८५ टक्के विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या तिन्ही शाखांची एकूण टक्केवारी ८६.७० इतकी आहे.
वाडा तालुक्यातून १,४६४ मुले तर १,३९४ मुली असे एकूण २,८५८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १,२१२ मुले तर १,२५३ मुली असे एकूण २,४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोखाडा तालुक्यात ६२१ मुले तर ३९१ मुली असे १० १२ विद्यार्थी परीक्षेस होते त्यापैकी ४६६ मुले व २९२ मुली अशी एकूण ७५८ विद्यार्थी उत्तीर्ण तर विक्र मगड तालुक्यातून ८३२ मुले ६५२ मुली असे एकूण १,४८४ विद्यार्थी परीक्षेस होते त्यापैकी ६६० मुले व ५३५ मुली असे १,१९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जव्हार तालुक्यातून ६२३ मुले व ५३२ मुली असे एकूण १,१५५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४९४ मुले व ३८७ मुली असे एकूण ८८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तलासरी तालुक्यातून १,०४१ मुले व ८२७ मुली असे १ हजार ८६८ विद्यार्थी परीक्षेला होते.पैकीं ८९४ मुले व ७५८ मुली असे १ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. डहाणू तालुक्यातून २ हजार ५१७ मुले व १ हजार ९५० मुली असे ४ हजार ४६७ विद्यार्थी परीक्षेसाठी होते. त्यातून २ हजार ६८ मुले व १ हजार ७३१ मुली असे एकूण ३ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पालघर तालुक्यातून २ हजार ५८६ मुले तर २ हजार ३५३ मुली असे ४ हजार ९३९ विद्यार्थी परिक्षेस होते. पैकी २ हजार ८४ मुले व २ हजार १४१ मुली असे ४ हजार २२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वसई तालुक्यातून या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० हजार १८६ मुले तर ८ हजार ६९३ मुली असे १८ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

यंदा निकाल घसरला ३.२२ टक्क्याने
बारावीच्या परीक्षेचा निकाल ८६.७० इतका लागला असला तरी गेल्या वर्षी हीच टक्केवारी ८९.९२ इतकी होती. म्हणजेच यावर्षीचा निकालाची एकूण टक्केवारी ३.२२ टक्क्याने घसरली आहे. मुलींनी यावर्षी या परीक्षेत बाजी मारली. गेल्यावर्षीपेक्षा ती ४.४८ टक्क्याने घसरण झाली आहे तर मुलांची हीच टक्केवारी तब्बल ६.८४ टक्क्याने घसरली आहे.

वसई 88.७८ %
पारोळ : या परीक्षांमध्ये मुलीने बाजी मारली असून ९० टक्के मुलीं तर ८४.१ मुले उत्तीर्ण झाली. वसर्ईचा निकाल ९९.७८ लागला आहे. या वर्षी ३९ हजार ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर या परिक्षेत ३३ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १८ हजार ६४ मूल तर ८ हजार ६९३
मुलींनी बाजी मारली आहे. तर वसईतून या वर्षी ७५२ रिपीटर विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ३५२ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

जव्हार ७६.८५ टक्के
जव्हार - तालुक्यात भारती विद्यापीठ सायन्स कॉलेजचा सर्वात जास्त ९५.५४ टक्के निकाल लागला असून तालुक्याचा सर्व शाखांचा मिळून ७६.८५ टक्के निकाल लागला आहे. ८७० विद्यार्थी पास होऊन तालुक्याचा निकाल ७६.८५ टक्के लागला आहे. तसेच के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्यु. कॉलेज चा कला व वाणिज्य शाखेचा ८०.८५ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व ज्यु. कॉलेज विनवळचा कला व विज्ञान शाखेचा ७०.१२ टक्के, भारती विद्यापीठ प्रशाळा व ज्यु. कॉलेजचा विज्ञान शाखेचा ९५.५४ टक्के, श्री गाडगे महाराज आश्रमशाळा व ज्यु. कॉलेज चालतवाडचा कला शाखेचा ७३.०७ टक्के, शासकिय माध्यमिक कन्या आश्रमशाळा साकूरचा कला शाखेचा ६४.०७ टक्के, तर शासकिय माध्यमिक आश्रमशाळा देहरेचा कला शाखेचा ८०.९५ टक्के तर एच. एस. आश्रमशाळा चांभारशेतचा विज्ञान व कला शाखेचा ७९.७८ टक्के निकाल लागला आहे.

डहाणू ८६.२२ टक्के
डहाणू : बारावी परिक्षेचा तालुक्याचा एकूण निकाल ८६.२२ टक्के लागला आहे. डहाणू तालुक्यात एकूण १७ कनिष्ठ महाविद्यालय असून या सर्वांमधून एकूण ४१६७ विद्यार्थी बारावी परिक्षेत बसले होते. त्यापैकी ३५९२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्या मध्ये कलाशाखेच्या १४७१ विद्यार्थी पैकी १२४७ विद्यार्थी पास झाले आहेत. तर वाणिज्य शाखेच्या १२८९ विद्यार्थी पैकी १०४७ विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच विज्ञान शाखेच्या १२८१ विद्यार्थीपैकी १२०४ विद्यार्थी पास झाले आहेत. जन उत्कर्ष प्रबोधिनी या महाविद्यालयाचा सर्वात जास्त ९३.३३ टक्के निकाल लागला. तिन्ही विभागात ते प्रथम आले आहेत. एम.सी.व्ही.सी. टेक्निकल विषयमध्ये एकूण १२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९४ विद्यार्थी पास झाले. डहाणूचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विष्णू एम. रावते यांनी तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

विक्रमगड ८० टक्के
विक्रमगड : या तालुक्याचा बारावीचा निकाल ८० टक्के लागला असून अरविंद आश्रमशाळा दादडे हिचा निकाल ८९.८६ टक्के लागला असून साखरे शाळा ७८ टक्के, आलोंडा हायस्कूल ७४.३१ टक्के, चिचंघर ८५.२१ टक्के तलवाडा ८६.६१ आदर्श शाळा ८९.७५ तर विक्रमगड हायस्कूल चा निकाल ७१.८६ टक्के लागला आहे सर्वच शाळांचा निकाल चांगला लागल्याने सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

मोखाडा ७४.९० टक्के
मोखाडा : या तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, खासगी हायस्कूल यांचा निकाल उत्तम लागला असून मोखाडा हायस्कूलचा निकाल ६८.४५ टक्के तर खोडाळा येथील मोहीते कॉलेजचा निकाल ८८.४६ टक्के इतका लागला आहे आॅनलाईन प्रक्र ीयेमध्ये अडचणी आल्याने अनेक शाळांची टक्केवारी कळू शकली नाही.

तलासरी ८८.५८ टक्के
तलासरी : बुधवारी दुपारी १२ बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. तालुक्यातून १२ वीच्या परीक्षेसाठी आर्ट्स कॉमर्स सायन्स माध्यमातून १८३९ विद्यार्थी पास होऊन तालुकायचा निकाल ८८.५८ टक्के लागला यामध्ये वेवजी च्या एम.बी.बी.आय विद्यालयाचा निकाल १०० लागला.

बोईसर कॉलेजचा निकाल शंभरीकडे
बोईसरच्या स्व . विद्या विनोद अधिकारी माध्यमिक विद्यालयाच्या स्व. कामिनी द. अधिकारी कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. शितल वढाळी ही विद्यार्थिनी ७८.६२ गुण मिळवून प्रथम आली. तर सोनीली वळवी (७८.१५) द्वितीय, विजय सांबरे, (७७.२३) तृतीय आला आहे. तर मंजु. म. अग्रवाल महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.०५ टक्के लागला असून रोशनी पाटील ८६.१५ टक्के गुण मिळवून प्रथम, श्वेता पाटील ( ८२.१५ टक्के) द्वितीय तर प्रतीक डोंगरे (८०.४६) हा विद्यार्थी तृतीय आला. स्व.गोदावरी .पा. अधिकारी वाणिज्य शाखेचा ९७.२४ टक्के निकाल लागला. कांचन भोरावकर हा विद्यार्थी (८२.६२ टक्के) प्रथम आला. तर द्वितीय उमेश रावते (८१.१५टक्के) तर तृतीय भाग्यश्री प्रजापती (८०.४६ टक्के) आली आहे. तारापूर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.६० टक्के लागला असून अंशु राय ही ९३.६९ टक्के गुण मिळवून प्रथम, तन्वी आदित्य (९२.१५ टक्के) द्वितीय तर ओमकार कदम (९१.५४ टक्के ) तृतीय आला आहे तर याच कॉलेजचा वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०० टक्के लागला असून कायनात खान ९४.७६ टक्के गुण मिळवून प्रथम , ब्रिजेश पाडिया ( ९१.५४ टक्के) द्वितीय, तर झील जैन (९१.०७ टक्के ) तृतीय आली आहे मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वाणज्यि शाखेचा निकाल १०० टक्के लागला. पिंकीकुमारी शॉ ८७.८४ मिळवून प्रथम , मनिषा सिंग ( ८२.७६ टक्के) द्वितीय तर सपना गुप्ता व अंजली सिंग (८१.५३ टक्के ) तृतीय आल्या.

Web Title: Palghar district results in 86.70 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.