पालघर जिल्ह्यात ३८ हजार बाप्पांची होणार स्थापना, दहशतवादी हल्ल्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:15 AM2017-08-24T03:15:07+5:302017-08-24T03:15:21+5:30
जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असून जिल्ह्यातील २ हजार ७६० सार्वजनिक व ३५ हजार ३२३ घरगुती गणेशांची स्थापना होणार असून हा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी ३ हजार २०० पोलीस, होमगार्ड व सुरक्षा दलाच्या टीमचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- हितेन नाईक।
पालघर : जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असून जिल्ह्यातील २ हजार ७६० सार्वजनिक व ३५ हजार ३२३ घरगुती गणेशांची स्थापना होणार असून हा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी ३ हजार २०० पोलीस, होमगार्ड व सुरक्षा दलाच्या टीमचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण ११ दिवसांपर्यंत गणेशोत्सवाची धूम राहणार असून जिल्ह्यात दिड दिवसाचे ४०६ सार्वजनिक व १५ हजार ७४४ खाजगी गणेश मूर्त्यांची स्थापना करण्यात येणार असून तीन दिवसाचे ३३७ सार्वजनिक व ६२० खाजगी, ५ दिवसाचे ७५८ सार्वजनिक व ६ हजार २५० खाजगी, ६ दिवसाचे १०२ सार्वजनिक व १ हजार ९०३ खाजगी, सात दिवसांचे ५६५ सार्वजनिक व ६ हजार ३३५, आठ दिवसाचे ३, नऊ दिवसाच्या १२, तर अकराव्या दिवसाच्या (अनंत चतुर्दर्शी) ५७५ सार्वजनिक व ४ हजार ४७१ खाजगी तर २१ दिवसांच्या २ सार्वजनिक अशा एकूण ३८ हजार ८3 गणेश मूर्त्यांची स्थापना जिल्ह्यात करण्यात येणार आहेत.
गुप्तचर यंत्रणेने दहशतवाद्यांच्या कारवाया बाबत दक्षतेचा इशारा दिल्याच्या पाशर््वभूमीवर गणेशोत्सव सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालघर पोलीस अधीक्षकांच्या देखरेखी खाली दोन अप्पर पोलीस अधिक्षक, सात उपविभागीय पोलीस अधिकारी, १४३ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, २ हजार ५५७ पोलीस, ३५० होमगार्ड व सुरक्षा बलाच्या टीम ची व्यवस्था करण्यात आली असून हा उत्सव व बकरी ईदही शांतेत व सद्भावात पार पडेल अशी माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी लोकमतला दिली.