पालघरचे समीकरण स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:03 AM2017-10-19T06:03:52+5:302017-10-19T06:04:01+5:30

पालघर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या व सरपंच पदांच्या निवडणुकीच्या निकालाला मंगळवारी सकाळी लागल्या नंतर बहुजन वि

 Palghar Equation Explained | पालघरचे समीकरण स्पष्ट

पालघरचे समीकरण स्पष्ट

Next

पालघर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या व सरपंच पदांच्या निवडणुकीच्या निकालाला मंगळवारी सकाळी लागल्या नंतर बहुजन विकास आघाडी ९, शिवसेना ७ तर भाजप ने २ ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तर अन्य ग्रामपंचायती ग्राम परिवर्तन विविध आघाड्यानी लढविल्या होत्या.
तालुक्यातील सातपाटी,नवी दापचरी, कर्दळ, माकणे, साखरे, आगरवाडी, करळगाव, पाम, टेम्भी, गुंदले, कोकनेर, बहाडोली, पोळे, धनसार, विळगी, विराथन खुर्द, काटाळे, पोफरण, उसरणी, नांदगाव तर्फे मनोर, कोरे, खर्डी, कोसबाड, गिरणोली, धुकटन, डोंगरे, चहाडे, नानिवली, पथराळी, खामलोली, नावझे, लोवरे, अक्करपट्टी, अश्या एकूण ३३ ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नानिवली, काटाळे आणि गिरणोली ह्या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर कोसबाड ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली.तर कर्दळ, कोसबाड, पोफरण साखरे, नानिवली, काटाळे ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनवीरोध निवडून आले. तर अक्करपट्टी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तालुक्यातील गिरणोली सरपंच-(पंढरी जाधव), धुकटन (प्रसाद भोईर), कर्दळ(नलू तुंबडा) खार्डी (राजेश घरत), कोकणेर (किशोर खडके), कोर े(प्राजक्ता तांडेल), लोवरे (चेतना तांडेल), माकने(रोहिणी शेलार), विलंगि (स्वाती पाटिल), ह्या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे सरपंच निवडून आल्याचा दावा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, तर धनसार (सरपंच-राजन घरत), गुंदले(रंजना कुंभारे), खामलोली (शुभांगी डगला), नावझे (विद्या लाबड), पोफरण (मनीषा पाटील), विराथन खुर्द (राजश्री किणी), डोंगरे (वैभव पाटील) ह्या सात ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे ह्यांनी केला आहे. तर भाजप ने बहाडोली ( व नवी दापचरी (साधना सुतार) ह्या ग्रामपंचायतीवर सरपंचाच्या दावा केला आहे तर अन्य ग्रामपंचायती पैकी सातपाटी ग्रा.प.वर एकता विकास मंच, सरपंच (अरविंद पाटील), आगरवाडी-काँग्रेस, बविआ, राष्ट्रवादी आघाडी, (वृषाली गावड) चहाडे-परिवर्तन पॅनल, (वत्सला माळी) नांदगाव तर्फे मनोर -अपक्ष, (पवन सवरा) पाम-अपक्ष (प्रभाकर पिंपळे), साखरे-बिनविरोध, (रवींद्र गोवारी) टेम्भी-अपक्ष, (सुरेश पाटील) उसरणी-ग्राम विकास पॅनल, (हरेंद्र पाटील) करळगाव-अपक्ष ( कौतुक वायडा) असे सरपंच निवडून आले आहेत.


संपामुळे जल्लोष ओसरला

मतमोजणीच्या दिवशी एसटी चा संप असल्याने ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्ते मतमोजणीला पोहचू शकले नाहीत. त्यामुळे विजयी उमेदवार जिंकल्या नंतरचा पक्षांमधील जल्लोष हवा तसा पहावयास मिळाला नाही. निकालानंतर माही ठिकाणी संघर्ष झाला.

Web Title:  Palghar Equation Explained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.