पालघर पत्रकारांवरील गुन्ह्याबाबत सोमवारी बैठक; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस अधिकारी यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:02 AM2018-07-07T00:02:49+5:302018-07-07T00:02:58+5:30
पालघर पोलीस स्टेशन मध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्या चे प्रकरण विधान परिषदेत गाजले. सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत सोमवारी नागपूर येथे बैठक बोलाविली असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी व पालघरमधील ज्येष्ठ पत्रकार यांना या बैठकीचे निमंत्रण दिले आहे.
पालघर : पालघर पोलीस स्टेशन मध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्या चे प्रकरण विधान परिषदेत गाजले. सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत सोमवारी नागपूर येथे बैठक बोलाविली असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी व पालघरमधील ज्येष्ठ पत्रकार यांना या बैठकीचे निमंत्रण दिले आहे.
शुक्रवारी पालघर जिल्हा पत्रकार समन्वयक समितीच्यावतीने पालघर पोलीस स्टेशन समोर एकजुटीचे दर्शन घडवून आम्ही वृत्तांकन करण्यासाठी आलोय आम्हाला अटक करा अशा घोषणा देत आंदोलन केले.
जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार राम परमार आणि हुसेन खान हे दोन पत्रकार २१ जून रोजी वाघोबा खिंडीत झालेल्या दरोड्या प्रकरणात पोलिसांनी महत्प्रयासाने अटक केलेल्या आरोपीचे छायाचित्रण करून पोलिसांच्या धाडसाचे वृत्त प्रकाशित करण्यासाठी गेले असताना वादग्रस्त कामिगरी साठी प्रसिद्धी पावलेल्या तौफिक सय्यद ह्या उपनिरीक्षकाने पत्रकारांशी हुज्जत घातली. तर ह्या प्रकरणाची कुठलीही सखोल चौकशी न करता पोनि.किरण कबाडी ह्यांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या दोन्ही पत्रकारावर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात पोलीस स्टेशन परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग सर्वांसमोर सादर करावे, असे आव्हानच पत्रकार संघटनांनी पोलिसांना दिले होते.मात्र ह्या सीसीटीव्ही च्या रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क खराब झाल्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी पत्रकारांना सांगितले होते. तर आज
(शुक्र वारी) समन्वय समितीच्या सोबत झालेल्या बैठकीत पो नि. कबाडी ह्यांनी मात्र आॅगस्ट २०१७ पासूनच पालघर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांसमोर दिली. सीसीटीव्ही संदर्भातील लपवाछपवी उघड झाल्यामुळे पत्रकार हुसेन यांच्यावर त्यांनी तौफिक सय्यद ह्या पोलीस अधिकाºयांची कॉलर पकडल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला. यामुळे संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. पत्रकार हुसेन ह्यांनी सय्यद ह्यांची कॉलर पकडल्याचे सीसीटीव्हीत आढळून आल्या नंतरच आम्ही गुन्हा दाखल केल्याचा सुरुवातीचा पालघर पोलिसांचा दावा ह्यामुळे फोल ठरणार आहे.
जिल्ह्यातील पालघर जिल्हा पत्रकार संघ,दि प्रेस क्लब आॅफ वसई विरार, मराठी पत्रकार परिषद (पालघर जिल्हा),वसई-विरार महानगर पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या पत्रकारांची जिल्हा पत्रकार समन्वय समिती स्थापन करण्यात आल्या नंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालघर च्या हुतात्मा स्तंभा जवळ पत्रकारांनी आंदोलनाला सुरुवात केली.
वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन्ही पत्रकारांना शासकीय कामात अडथळा आणल्याचा बनाव करून अटक करण्यात आली, तर मग आम्हालाही अटक करा, अशा घोषणा देत शेकडो पत्रकारांनी पालघर पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून सोडला. यावेळी कबाडी, सय्यद ह्यांच्या सह अन्य दोन पोलिसांना निलंबित करावे, जिल्हा पोलिस अधीक्षक सिंगे ह्यांची तात्काळ बदली करावी, कलम ३५३ ची नवीन तरतूद रद्द करावी, या दोन पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्या ह्यावेळी करण्यात आल्या.
श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, भाजप चे उपाध्यक्ष प्रशांत पाटील,बार असोसिएशन वसई,कष्टकरी संघटना,आदिवासी दलित सेना आदींनी उपस्थित राहून ह्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
कलम ३५३ मधील नवीन तरतुदी प्रमाणे सर्वसामान्य लोक तलाठी,ग्रामसेवक,सरकारी दवाखाने तसेच विविध विभागात आपल्या प्रलंबित असलेल्या कामाबाबत आग्रही भूमिका स्वीकारून त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. ह्या गुन्ह्यात लगेच जमीन मिळत नसल्याने सर्वसामान्यांनाही आता तुरु ंगात बसावे लागणार आहे.