पालघरमध्ये गतवर्षात १,७५५ आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:58 PM2020-01-02T22:58:51+5:302020-01-02T22:58:55+5:30

जिल्ह्यात वर्षभरात घडले ८५६ गुन्हे; वसई वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत गुन्हेगारी घटली

In Palghar last year, 5 accused Gajaad | पालघरमध्ये गतवर्षात १,७५५ आरोपी गजाआड

पालघरमध्ये गतवर्षात १,७५५ आरोपी गजाआड

Next

- हितेन नाईक

पालघर : पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत १ जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ८५६ गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार ०७५५ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी सुमारे ५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यात अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील १९ कोटी ६८ लाख २३ हजार ९९९ रुपयांचा आणि चोरटी रेती वाहतूक गुन्ह्यातील १४ कोटी ६१ लाख ५५ हजार ७५८ रुपयांच्या किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या बोधचिन्हाचा सन्मान राखीत जिल्ह्यात पालघर पोलिसांकडून कडक कारवाईचा बडगा उचलण्याचे काम जोराने सुरू आहे. वसई तालुका वगळता इतर तालुक्यांतील गुन्हेगारीच्या प्रकरणाचे प्रमाण कमी असून पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे.

जिल्ह्यातील नदी, नाले, खाड्यांतून सक्शन पंपाद्वारे चोरट्या पद्धतीने करण्यात येणारा रेतीचा उपसा पाहता पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी रेती-माफियांना जरब बसावी म्हणून पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे स्वत: या कारवाईत उतरले होते. रेती चोरांविरोधात ११२ गुन्हे दाखल करून १४ कोटी ६१ लाख ५५ हजार ७५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत २६३ आरोपींवर कारवाई केली होती.
जिल्ह्यातील बहुतांशी भागात मादक द्रव्याचे छुपे वितरण करण्यात येत असून तरुण वर्ग या मादक द्रव्याच्या आहारी जात आहे. यांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणी ११८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून १९ कोटी ६५ लाख २३ हजार ९९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु ही कारवाई तोकडी पडत असून मादक द्रव्याच्या वितरणाचे लोण आदिवासीबहुल गाव-पाडे, किनारपट्टीवरील गावातही पोचले असल्याने व्यसनाधीनतेकडे वळणाºया तरुण पिढीला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी ही कारवाई कडकपणे राबविण्याची मागणी केली जात आहे. याच बरोबरीने तरुण वर्गात आवडीचा ठरलेला, परंतु आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरलेल्या गुटख्याची विक्री सर्रासपणे पानटपरीपासून ते छोट्या-मोठ्या दुकानात राजरोसपणे सुरू असून या गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी गुजरात राज्यातून बेकायदेशीपणे पालघर, ठाणे व मुंबईकडे चोरट्या पद्धतीने नेण्यात येणाºया १८२ आरोपींविरोधात १२१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून १२ कोटी ८८ लाख ३२ हजार ४५३ रुपये किमतीचा मुद्देमाल एका वर्षात जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारू विक्री आणि वाहतूक करण्याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार ६८९ आरोपींविरोधात कारवाई करून त्यांच्यावर ६७३ गुन्हे दाखल करण्यात आले. यात अवैध दारू आणि वाहने असा २ कोटी ४९ लाख ७१ हजार ४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुगाऱ्यांकडून ५८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पालघरमध्ये ४३६ जुगारी आरोपींविरोधात ७७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८ लाख २५ हजार ३८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यानुसार ११८ आरोपींविरोधात ८५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून १९ कोटी ६८ लाख २३ हजार ९९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, तर पिटा कायद्यानुसार १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३६ आरोपींवर कारवाई करून एक लाख १७ हजार ७४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आर्म अ‍ॅक्टनुसार २९ आरोपींविरोधामध्ये १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२ लाख ६३ हजार ३८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Web Title: In Palghar last year, 5 accused Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.