पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जणांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:49 AM2018-05-11T05:49:25+5:302018-05-11T05:49:25+5:30
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे.
पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी ३ मेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. गुरुवारपर्यंत १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी संदीप रमेश जाधव (अपक्ष, समता सेना), बळीराम सुकर जाधव (बहुजन विकास आघाडी), वसंत नवशा भसरा (बहुजन विकास आघाडी), दामोदर बारकू शिंगडा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), पास्कल जान्या धनारे (भारतीय जनता पार्टी), राजेंद्र धेंड्या गावित (भारतीय जनता पार्टी), शंकर भागा बदादे (मार्क्सस्टि, लेनीस्ट पार्टी आॅफ इंडिया-रेड फ्लॅग), राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी),मधुकर पांडुरंग चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), अशोक गोविंद शिंगडा (भारिप बहुजन महासंघ), प्रभाकर धोंडू उराडे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
याआधी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला, वनशा सुरजी दुमाडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी ११ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून, अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख १४ मे आहे.