पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेचा उमेदवार आज शक्तीप्रदर्शनाने भरणार अर्ज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:24 AM2018-05-08T06:24:27+5:302018-05-08T06:24:27+5:30

शिवसेने कडून श्री निवास वणगांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता पाहता ^काटे की टक्कर देण्यासाठी भाजप ने आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाणा च्या अध्यक्षते खाली पालघर मध्ये बैठक आयोजित केली.

Palghar Lok Sabha by-election: Shivsena's candidate to fill up Nomination today? | पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेचा उमेदवार आज शक्तीप्रदर्शनाने भरणार अर्ज?

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेचा उमेदवार आज शक्तीप्रदर्शनाने भरणार अर्ज?

googlenewsNext

- हितेन नाईक
पालघर - शिवसेने कडून श्री निवास वणगांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता पाहता ^काटे की टक्कर देण्यासाठी भाजप ने आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाणा च्या अध्यक्षते खाली पालघर मध्ये बैठक आयोजित केली. जिल्ह्यातील बूथ वाइज नियुक्त्या जाहीर करून निवडणुकीस सज्ज राहण्याचे आदेश ह्यावेळी सर्वाना देण्यात आले. तर दुसरी कडे सेनेनेही दोन ठिकाणी बैठका घेत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने पालघर ला जमण्याचे जाहीर केले आहे
भाजप ची १२ मंडळे असून आज पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत सर्वांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री चव्हाण, कोकण विभाग संघटक मंत्री सतीश दौंड, जिल्हापरिषद अध्यक्ष विजय खरपडे, आमदार पास्कल धनारे, प्रदेश सदस्य बाबजी काठोळे, डहाणू चे नगराध्यक्ष भरत राजपूत, सभापती अशोक वडे, आदी पदाधिकारी ह्यावेळी उपस्थित होते.
जिल्हापरिषद व पंचायत समतिी सदस्यांनाही निवडणुकीची जबाबदारी वाटप करून देण्यात आली. व त्यांनी आपला प्रभाग सोडू नये अश्या सूचनाही देण्यात आली. ज्या गट किंवा प्रभागात भाजप चा सदस्य नाही तेथे त्या भागातील प्रमुख पदाधिकार्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
दिवंगत खासदार चिंतामण वनगाच्या अकाली मृत्यू नंतर त्यांचा मुलगा श्रीनिवास ह्यानाचा भाजप कडून तिकीट देण्याचे पक्के ठरले असताना त्यांनी शिवसेनेत जाण्याची घाई केली असे चव्हाणांनी सांगितले.भाजप पक्षाला नुकसान होईल असे कुठलेही पाऊल वनगा कुटुंबीय उचलणार नाहीत असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.मात्र माझे सर्व निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या हाती आहेत असे श्रीनिवास वनगा नी जाहीर केले होते. उद्या (मंगळ वारी) सकाळी ११ वाजता श्रीनिवास वनगा ह्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व सेनेची ताकद दाखिवण्यासाठी गाव-पाड्यातून कार्यकर्ते आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पाशर््वभूमीवर सेना पदाधिकाऱ्यांच्या पालघर आणि बोईसर येथे दुपारी बैठका पार पडल्या.
३मे ते १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी असून ११ मे ला छाननी, १४ मे ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २ दिवस शिल्लक राहिले असून २३ लोकांनी एकूण ४४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मात्र एकही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले. आज शिवसेनेच्या वतीने श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सेनेने वेट अ‍ॅण्ड वॉच पवित्रा दिवसभर घेतल्याने व आपला उमेदवार मंगळवारी अर्ज भरणार आहे. त्यासाठी सर्व ताकदीनिशी पालघरला या एवढाच फतवा जारी केल्याने इतर पक्षांनीही उमेदवारांची घोषणा केली नाही.

सर्वच पक्षांचे पहले आप, पहले आप

काँग्रेस चे माजी राज्यमंत्री राजेंद्र गवितांनी भाजप मध्ये प्रवेश केला असून पोट निवडणुकीत ते भाजप कडून निवडणूक लढविणार अश्या बातम्या सोशल मीडियावर झळकत आहेत.मात्र ह्या वावड्या असून गावित हे काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत टिळक भवनात उपस्थित आहेत.त्यामुळे अश्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये असे जिल्हाध्यक्ष केदार काळे ह्यांनी जाहीर केले आहे.

लोकमतशी बोलतांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष केंदार काळे म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा ही हायकमांड करते ती महाराष्टÑाचे पक्षप्रभारी अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे करतील किंवा त्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्रक निघेल, त्यामुळे आम्ही कोणतीही घाई करणार नाही तर भाजपाच्या सर्वच नेत्यांचे फोन नॉट रिचेबल होते.

Web Title: Palghar Lok Sabha by-election: Shivsena's candidate to fill up Nomination today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.