पालघर लोकसभा पोटनिवडणूक : आज सेना, काँग्रेसचे उमेदवार जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:31 AM2018-05-07T06:31:17+5:302018-05-07T06:31:17+5:30
पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवणूकीसाठी शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे याबाबतची घोषणा सायंकाळी करणार असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पालघर - पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवणूकीसाठी शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे याबाबतची घोषणा सायंकाळी करणार असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसतर्फे हायकमांडला माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत , माजी खासदार दामू शिंगडा आणि नवा चेहरा म्हणून मुंबईचे माजी सहायक पोलीस आयुक्त मधुकर चौधरी या तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. त्यातून एकाच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पत्रकार परिषदेव्दारे अथवा पत्रकाव्दारे करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने वनगा कुटुंबियांना अज्ञातस्थळी ठेवले असून जोपर्यंत श्रीनिवास हे त्यांचा अर्ज दाखल करीत नाही व माघारीची मुदत उलटून जात नाही तोपर्यंत ते प्रकट होणार नाहीत अशी खबरदारी घेतल्याचे समजते. त्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक, जिल्हा प्रमुख राजेशभाई शाह या त्रिमूर्तीने सगळी ताकद पणाला लावली असून फाटक व शाह हे जातीने हे संपूर्ण आॅपरेशन हॅन्डल करीत आहेत. तर एकनाथ शिंदे स्वता त्यावर लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण देशाला धक्का बसेल असा राजकीय चमत्कार मतपेटीच्या माध्यमातून आम्ही २८ मे ला घडवून दाखवू असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.
काँग्रेसने या पोटनिवडणूकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते त्यानुसार ११ अर्ज आले होते. माजी राज्यमंत्री रमेश बागवे आणि ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या व त्याअंती राजेंद्र गावित, दामू शिंगडा, आणि मधुकर चौधरी या तीन नावांची शिफारस केली आहे. यापैकी मधुकर चौधरी हे मुुंबई पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त होते. दोन वर्षापूर्वी निवृत्त झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रीय झाले असून ते मुळचे जव्हारचे आहेत व विक्रमगडला राहतात. नवा चेहरा देण्याचा प्रयत्न त्यांची शिफारस केली गेल्याचे समजते. दामू शिंगड हे सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे व वयोमानामुळे पक्ष कार्यात फारसे सक्रीय नाहीत तरीही त्यांनी उमेदवारी मागितली आहे व जो अर्ज मागेल त्याचे पक्षातील स्टॅचर लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या नावाची निवड केल्याचे काँग्रेसच्या सुत्रांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
धर्मनिरपेक्ष मते एकवटण्याचा प्रस्ताव-काळे
च्राष्टÑवादीने आम्हाला या निवडणूकीत सहाकार्य करावे असे आम्ही आवाहन केले आहे. त्याला त्यांनी अनुकुलता दर्शविली आहे परंतु याबाबतचा निर्णया त्यांच्या आणि काँगे्रसच्या केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर होणार आहे. व तशी घोषणा योग्य वेळी होईल.
च्डाव्यांना आम्ही असेच आवाहन केले आहे परंतु त्यांचाही केंद्रीय पातळीवर होत असतो तो होईपर्यंत दक्षता म्हणून ते कदाचीत त्यांच्या उमेदवाराला अर्ज भरायला लावतील आणि निर्णय झाल्यावर योग्य मुदतीत ते माघार घेतील. - केदार काळे, पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष
शिवसेना चमत्कार घडवेल एवढेच सांगतो तो काय, कधी,
केव्हा, कसा घडेल? ते २८ तारखेला कळेल. त्याचा शुभारंभ उद्या उमेदवारीने घडेल. - रविंद्र फाटक, आमदार, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख