पालघर पोलिसांना गुन्हे उकलण्यात अपयश! मात्र २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्हे रोखण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:26 AM2020-01-19T00:26:34+5:302020-01-19T00:27:15+5:30

पालघर पोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे

Palghar police fail to solve crime! But compared to 2018, the success in preventing crime in 2019 | पालघर पोलिसांना गुन्हे उकलण्यात अपयश! मात्र २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्हे रोखण्यात यश

पालघर पोलिसांना गुन्हे उकलण्यात अपयश! मात्र २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्हे रोखण्यात यश

Next

- मंगेश कराळे

नालासोपारा : पालघरपोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे, मात्र दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे.
एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणाऱ्या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण व अपघात अशा गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यांत मात्र वाढ होत आहे. २०१८ साली गुन्ह्यात वाढ झाली होती, पण उकलही चांगली झाली होती, तर २०१९ साली गुन्ह्यांत घट झाली, पण दाखल गुन्ह्यांची उकल फारशी समाधानकारक झालेली नाही.

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या अंतर्गत असलेले तुळिंज, अर्नाळा, विरार, माणिकपूर आणि वालीव या पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणा-या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांची जास्त नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत.

वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये लोंढेचे लोंढे दररोज येत असल्याने जनसंख्या झपाट्याने या भागातील वस्ती वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या पोलीस यंत्रणा ज्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांचा शोध घेत आहेत, त्यातील अनेक गुन्हेगार पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा, वसई, विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेताना आढळून येत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना लपण्यासाठी नालासोपारा शहरात स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने हे शहर या गुन्हेगारांसाठी सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी, आतंकवादी घडामोडी, नकली नोटा, बांग्लादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गुन्हेगारांचे माहेरघर म्हणजे नालासोपारा शहर अशी जणू आता नालासोपारा शहराची ओळखच
निर्माण झाली आहे.

तीन हजार गाड्यांचा अद्याप शोध नाही
२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांअंतर्गत हजारो वाहने चोरीला गेलेली आहेत. या चोरीला गेलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांपैकी ३००० वाहनांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

Web Title: Palghar police fail to solve crime! But compared to 2018, the success in preventing crime in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.