पालघर पालिकेचे मतदान २४ मार्चला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:43 AM2019-02-22T05:43:49+5:302019-02-22T05:44:04+5:30
आचारसंहिता लागू : २५ ला मतमोजणी, राजकीय हालचालींना वेग
पालघर : पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्र म जाहीर केला असून येत्या २४ मार्च रोजी ही निवडणूक होणार आहे. त्याची आचारसंहिता २१ फेब्रुवारीपासून जाहीर झाली आहे.
पालघर नगर परिषदेची मुदत १८ एप्रिल २०१९ अशी असून त्या आधी २४ मार्च रोजी होणारी ही निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून आलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रक्रि येमध्ये नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम दिनांक १३ मार्च दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे.
यामध्ये नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीशाकडे या विरोधात अपील करण्यात मुभा देण्यात आली आहे. यासाठी अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी त्याचा निकाल देण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणुकीमध्ये निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसा नंतरच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रविवार २४ मार्च रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. त्यानंतर २५ मार्च रोजी मतमोजणी होईल.
सुटीच्या दिवशी काम नाही
च्हा कार्यक्र म जिल्हाधिकारी सोमवार २५ फेब्रुवारी रोजी जाहीर करतील त्यानंतर २८ फेब्रुवारी ते ७ मार्च पर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत नाम निर्देशन पत्र भरावयाची मुदत आहे.
च्याच दरम्यान नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार असली तरी शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही