पालघर जि.प. : शिक्षकभरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:56 AM2018-07-14T02:56:58+5:302018-07-14T02:57:13+5:30

शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला असून आपल्या स्वनिधीतून होणाऱ्या भरतीत स्थानिकांना सामावून घेण्यात येणार आहे.

 Palghar : Prefer locality in teacher recruitment | पालघर जि.प. : शिक्षकभरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य

पालघर जि.प. : शिक्षकभरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य

Next

पालघर : शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला असून आपल्या स्वनिधीतून होणाऱ्या भरतीत स्थानिकांना सामावून घेण्यात येणार आहे. विधान परीषदेचे आमदार निरंजन डावखरे यानी या बाबत जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले आहेत
कोकणात स्थानिक बेरोजगार तरुणांना शिक्षक भरतीत प्राधान्य देण्याची मागणी होत असतानाच पालघर जिल्हा परिषदेने आपल्या स्वनिधीतून होणाºया शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे आभार मानले आहेत. तसेच पालघर जिल्ह्या व्यतिरिक्त रिक्त जागा राहिल्यास कोकणातील उमेदवारांनाही प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षण विभागात दहा वर्षांपासून शिक्षकांची भरती झालेली नाही. अशा परिस्थितीत कोकणातील स्थानिक तरु णांमध्ये अस्वस्थता आहे. त्या अनुशंगाने नऊ महिन्यांसाठी मासिक आठ हजार रु पये मानधनावर पदवी व बी. एड. शैक्षणिक अर्हता असलेल्या १२० उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी येत्या १९ जुलैपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांची गुणांच्या आधारे नियुक्ती केली जाणार असल्याचे पालघर जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे.

पालघरचा पॅटर्न कोकणात

पालघर जिल्ह्याप्रमाणेच कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक तरु णांच्या भरतीचा पालघर पॅटर्न राबविण्याची गरज आहे. त्यातून स्थानिक बेरोजगार शिक्षकांना नोकरी मिळू शकेल. कोकणात हा पॅटर्न राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी प्रतिक्रि या व्यक्त करताना पत्रकारांना सागीतले.

Web Title:  Palghar : Prefer locality in teacher recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.