पालघर पं. स.वर पुन्हा सेनेचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:14 AM2020-01-09T00:14:01+5:302020-01-09T00:14:13+5:30

पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ३४ पैकी २३ जागांवर निर्विवाद यश मिळून शिवसेनेने पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे.

Palghar Pt. Army flags again on Sat. | पालघर पं. स.वर पुन्हा सेनेचा झेंडा

पालघर पं. स.वर पुन्हा सेनेचा झेंडा

Next

पंकज राऊत 
बोईसर : पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ३४ पैकी २३ जागांवर निर्विवाद यश मिळून शिवसेनेने पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे. या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी तसेच भाजपची गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पीछेहाट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने आपले खाते उघडले आहे.
पालघर पंचायत समितीच्या ३४ गटांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून तारापूर एमआयडीसीमधील टीमा सभागृहाच्या आवारात करण्यात आली. त्यावेळी प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. जसजसे निकाल जाहीर होत होते तशी गर्दी कमी होत होती. शिवसेनेने पालघर पंचायत समितीच्या ३४ पैकी ३२ गणांमध्ये आपले उमेदवार उभे करून २३ उमेदवार निवडून आणले आहेत. २०१५ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेन १९ जागा जिंकल्या होत्या, तर बहुजन विकास आघाडीच्या १८ पैकी ४ उमेदवार, भाजपचे २४ पैकी केवळ २ उमेदवार निवडून आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी २ आणि मनसेने १ तर २ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. २३ जागांवर विजय मिळवून सेनेने तालुक्यातील आपली विजयी घोडदौड कायम ठेवलीे, तर शिवसेनेने सरावलीची जागा बिनविरोध निवडून आणून आपले खाते उघडले होते. या निवडणुकीत मान गटातून मनसेचे योगेश पाटील २३६४ सर्वाधिक मतांनी विजयी झाले तर सर्वात कमी ४७ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद पंडित हे निवडून आले आहेत.
>शिवसेनेचे विजयी उमेदवार
स्मीता पवार (तारापूर), रु चिता गोवारी (कुरगाव), तुळशीदास तामोरे (दांडी ), मनिषा पिंपळे (नवापूर), तनुजा राऊत (सालवड), श्वेता देसले (पास्थळ), वासंती दुमाडा (काटकरपाडा -बोईसर), मुकेश पाटील (सरावली - अवधनगर), वैभवी राऊत (सरावली- बिनविरोध ), निधी बांदिवडेकर (शिगाव खुताड ), कस्तुरी पाटील (बºहाणपूर), भालचंद्र मढवी (टेण), रंजना म्हसकर (मनोर), दिलीप पाटील (सावरे-एम्बुरे), तुषार पाटील (दहिसरतर्फे मनोर ), सीमा पाटील (नंडोरे - देवखोप), जितेंद्र मेर (मुरबे), हर्षदा तरे (सातपाटी), शैला कोलेकर (शिरगाव), भारती सावे (केळवा), मीना धोडी (मायखोप), रेखा तरे (एडवण), तुकाराम सुमडा (विराथन बुद्रुक)
बहुजन विकास आघाडीचे विजयी उमेदवार (गण)
अनिल रावते (दांडीपाडा ), विनोद भावर (उमरोळी), रु पेश धांगडा (सफाळे ), सुरेश तरे (नवघर घाटीम)
भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार (गण)
अजय दिवे (बोईसर ), सलोनी वडे (बोईसर )
राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार (गण)
आनंद पंडित (खैरेपाडा), चेतन पाटील (धुकटण )
मनसेचे योगेश पाटील (मान गट)
महेंद्र अधिकारी (कोंढाण), तनुजा (माहीम) हे २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

Web Title: Palghar Pt. Army flags again on Sat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.