पालघर : ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट? : मंगळवारपासून काम बंदचा दिला इशारा, पुरवठा कर्मचारी संपावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:45 AM2017-10-09T01:45:45+5:302017-10-09T01:46:00+5:30

गेल्या चार वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने निर्देश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊन आदेश जारी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी (पुरवठा विभाग) संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे.

Palghar: A rumble on the ration of Diwali? : Work stopped bandwidth on Tuesday, strike strikes employees? | पालघर : ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट? : मंगळवारपासून काम बंदचा दिला इशारा, पुरवठा कर्मचारी संपावर?

पालघर : ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट? : मंगळवारपासून काम बंदचा दिला इशारा, पुरवठा कर्मचारी संपावर?

Next

हितेन नाईक 
पालघर : गेल्या चार वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने निर्देश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊन आदेश जारी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी (पुरवठा विभाग) संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे. त्यामुळे ऐ दिवाळीत रेशनवरील धान्य पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. राज्यासह पालघरमधील पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी पदोन्नत नायब तहसीलदारांसमवेत १० आॅक्टोबरपासून हे कामबंद आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय ते मागे न घेण्याचा इशाराही यावेळी दिलेला आहे.
२०१२ पासून ते २०१५ पर्यंत महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध पद्धतीने राज्यासह पालघरातही हि आंदोलने केली होती. या आंदोलनात विविध मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्या गेल्या व तसे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले त्याचबरोबरीने २०१४ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव, वनविभाग आदी विभागांच्या सोबत बैठका करून संघटनांनी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मांडल्या गेल्या तदनंतर त्यातील काही मागण्या मान्य केल्या गेल्या व त्याबाबतीतील शासन निर्णय जारी करण्याविषयीची आश्वासनेही देण्यात आली होती. मात्र आजपावेतो या मान्य मागण्याबाबतीत कोणताही शासन निर्णय अंमलात न आल्यामुळे हे कर्मचारी त्यांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्याअनुषंगाने आपल्या मागण्यांसाठी पुन्हा कामबंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा राज्यातील कर्मचाºयांनी दिला आहे.

Web Title: Palghar: A rumble on the ration of Diwali? : Work stopped bandwidth on Tuesday, strike strikes employees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.