पालघरला हुतात्म्यांना वंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 02:31 AM2018-08-15T02:31:51+5:302018-08-15T02:32:23+5:30

इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Palghar salutes news | पालघरला हुतात्म्यांना वंदन

पालघरला हुतात्म्यांना वंदन

googlenewsNext

पालघर : इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पवित्र झालेल्या ध्वजाचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळेसह अनेक मान्यवरांनी श्रद्धापूर्वक पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
१४ आॅगस्ट १९४४ पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची प्रथा अविरत सुरू असून आज पालघर तहसीलदार कार्यालया जवळील हुतात्मा स्मारकाजवळून हुतात्मा स्तंभापर्यंत मूक मिरवणूक काढण्यात आली. १२ वाजून ३९ मिनिटांनी ‘दिन खून के हमारे, यारो न भूल जाना’ हे स्फूर्ती गीते विद्यार्थ्यांनी गायले. त्यानंतर पालकमंत्री विष्णू सवरा, माजी आमदार नवनीतभाई शहा, आमदार अमित घोडा, उपनगराध्यक्ष रईस खान, जि.प, उपाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर,नायब तहसीलदार नवनीत पाटील, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण, भाजपचे प्रशांत पाटील, बाबा कदम, सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शहा, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, नगरसेवक प्रीतम पाटील, सचिन पाटील, आदींसह स्वातंत्रसैनिकांचे कुटुंबीय, अनेक पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

१४ आॅगस्ट १९४२ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हजारो देशबांधव ब्रिटीशांविरोधी घोषणा देत कचेरीचा ताबा घेण्यासाठी निघाले होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी आंदोलकांना शिवीगाळ केल्या नंतर चवताळलेले आंदोलक पोलिसांचे कडे तोडून कचेरीच्या दिशेने त्वेषाने निघाले.
यावेळी इंग्रज अधिकारी अल्मेडा ह्यांनी केलेल्या गोळीबारात प्रथम गोविंद गणेश ठाकूर हे जखमी होऊन त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले.आपल्या सहकाºयाच्या झालेल्या मृत्यूने स्वातंत्र्यवीर बेभान झालेत.
भारत माता की जय च्या घोषणा देत ते त्वेषाने चालून गेले. यावेळी झालेल्या अमानुष गोळीबारात रामप्रसाद तिवारी, काशीनाथभाई हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामचंद्र महादेव चुरी आणि सुकुर गोविंद मोरे यांना हौतात्म्य प्राप्त झाले.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र जय्यत तयारी
बोईसर : स्वातंत्र्य दिना निमित्त बोईसरसह - तारापूर परिसरातील शाळा , महाविद्यालये, ग्रामपंचायती व शासकीय कार्यालयात ध्वजरोहणा बरोबरच विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी दिवसभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू होती.
बोईसर एज्युकेशन च्या डॉ स.दा. वर्तक विद्यालयात ध्वजरोहण पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे त्या नंतर इयत्ता १० वी च्या परीक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळ विलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लेझीम, परेड, कवायतीची बॅण्ड पथकासह एका ताला सुरात रिहर्सल सुरू होती तर शाळा, कार्यालयातील ध्वजरोहणाच्या परिसराची स्वच्छता करण्यात येत होती तर बाजारात राष्ट्रध्वजाबरोबरच टी शर्टही झळकत होते.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्र माची सज्जता

बोर्डी : ७१ व्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण समारंभाचा मुख्य शासकीय कार्यक्र म उपजिल्हाधिकारी पांडुरंग मगदुम यांच्या हस्ते पारनाका येथील के. एल. पोंदा हायस्कूलच्या पटांगणावर ९ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. या करिता नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार राहुल सारंग यांनी केले आहे.
बुधवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्र माची धावपळ सर्वत्र दिसून आली. पूर्वसंध्येला विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणचे पटांगण आणि परिसराची स्वच्छता करण्यासह ध्वजस्तंभाची रंगरंगोटी करण्यावर भर देण्यात आला. तर शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परेड आणि ध्वजसलामीसाठी सराव केला.
तालुक्यातील ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पारनाका येथे होणार आहे तर भारतीय तटरक्षक दलाकडून ध्वजारोहण कार्यक्र मानंतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी संस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले जाणार आहे. तर दुपारी ३ वाजता तरूणांकरिता या दलात भरती होण्याकारिता लागणारी पात्रता या विषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्याची माहिती कमांडंट एम. विजयकुमार यांनी दिली.

Web Title: Palghar salutes news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.