पालघर एसटी डेपोला २१० कोटींचा तोटा

By admin | Published: December 7, 2015 12:52 AM2015-12-07T00:52:31+5:302015-12-07T00:52:31+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या पालघर आगारातंर्गत चालणाऱ्या एसटी सेवेचा आर्थिक कणाच खाजगी रिक्षा, काळी पिवळी सेवेने मोडला असून या आगाराकडून होणाऱ्या दररोजच्या ६८० फेऱ्यांतून दोन

Palghar ST Depot Loss of 210 Crore | पालघर एसटी डेपोला २१० कोटींचा तोटा

पालघर एसटी डेपोला २१० कोटींचा तोटा

Next

हितेन नाईक,  पालघर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या पालघर आगारातंर्गत चालणाऱ्या एसटी सेवेचा आर्थिक कणाच खाजगी रिक्षा, काळी पिवळी सेवेने मोडला असून या आगाराकडून होणाऱ्या दररोजच्या ६८० फेऱ्यांतून दोन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक डोलारा उळमळू लागला असून जुनाट, नादुरुस्त बसेसमधून प्रवाशाना असुरक्षितपणे प्रवास करावा लागत ो आहे. तसेच अन्य सुविधाही मिळत नाहीत, परिणामी प्रवाशीही हळूहळू खाजगी सेवेकडे वळू लागला आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १ आॅगस्ट १९४८ ला राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेला राज्यात सुरुवात झाल्यानंतर १ जून १९५२ ला पालघरमध्ये प्रथम आगार सुरू झाले. पालघर - चिंचणी, पालघर - वाडा, पालघर - मनोर या तीन मार्गावर एसटी सुरु झाल्याने या मार्गावरील खाजगी सेवेच्या गाड्या बंद पडल्या. प्रवाशानीही एसटी सेवेला भरभरुन प्रतिसाद दिल्याने पश्चिम रेल्वेनेही पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागा स्थानकासाठी दिली. मात्र गेल्या काही वर्षांपासून काळी-पिवळी व सहा आसनी रिक्षांचे आक्रमण एसटीच्या जीवावर उठले आहेत.
एसटी सेवा पुरविताना ६० टक्के पेक्षा कमी भारमान (उत्पन्न) असेल तर ती फेरी बंद केली जाते. परंतु ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘‘प्रवाशांच्या सेवेसाठी या आमच्या बी्रदवाक्याची जपवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
- व्ही. एस. भंडारे, पालघर आगार व्यवस्थापक

Web Title: Palghar ST Depot Loss of 210 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.