Palghar: तरुणाने दाखवले प्रसंगावधान! विजेचा धक्का बसून तडफडणाऱ्या मुलीचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:47 PM2023-07-06T12:47:35+5:302023-07-06T12:47:49+5:30

Palghar: पालघर तालुक्यातील माहीम येथे शिकवणी ला जाणाऱ्या एका तिसरी येथे मध्ये शिकणाऱ्या मुलीला विद्युत शॉक लागून ती मृत्यूशी झुंज देत असताना माहीम फणसबाग येथील सुहास प्रकाश म्हात्रे यांनी प्रसंगावधान दाखवीत त्याची मुले चे प्राण वाचविण्यात यश मिळवले

Palghar: The youth showed the opportunity! The girl who was electrocuted was saved | Palghar: तरुणाने दाखवले प्रसंगावधान! विजेचा धक्का बसून तडफडणाऱ्या मुलीचे वाचले प्राण

Palghar: तरुणाने दाखवले प्रसंगावधान! विजेचा धक्का बसून तडफडणाऱ्या मुलीचे वाचले प्राण

googlenewsNext

- हितेन नाईक
पालघर - पालघर तालुक्यातील माहीम येथे शिकवणी ला जाणाऱ्या एका तिसरी येथे मध्ये शिकणाऱ्या मुलीला विद्युत शॉक लागून ती मृत्यूशी झुंज देत असताना माहीम फणसबाग येथील सुहास प्रकाश म्हात्रे यांनी प्रसंगावधान दाखवीत त्याची मुले चे प्राण वाचविण्यात यश मिळवले त्या मुलीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर तिची प्रकृती स्थिर असल्यास डॉक्टरांनी सांगितले.

माहीम टेंभी येथील त्रिशा मेहेर ही तिसरी येथे शिकणारी मुलगी आपल्या मित्र आणि मैत्रिणी सोबत शिकवणीसाठी पायी माहीम फणसवाडी ते जात होती यावेळी खारोडी व फनसभा दरम्यान असणाऱ्या पायी वाटेवरून जात असताना विद्युत वाहक तार तुटून पडल्याने त्याचा स्पर्श त्या मुलीला होताच तिला जबर शॉक बसला तो शॉक लागल्यानंतर ती रस्त्यावर पडून धडपडू लागल्याने तिच्या सोबत असणाऱ्या मुलांनी घाबरून पळ काढला.मुले जोरजोरात ओरडू लागल्याने बाजूलाच वाडीत रोजंदारीवर काम करणाऱ्या भारती म्हसे ह्या महिलेने जोरजोरात ओरडून मदतीसाठी हाका मारल्या.ह्यावेळी शेजारी असणाऱ्या सुहास म्हात्रे आणि चैतन्य वर्तक ह्या दोन तरुणांनी मदतीसाठी धाव ठोकली.रस्त्यात ती मुलगी तडफडत असल्याचे पाहिल्यावर त्यांनी प्रथम जवळच असलेल्या विद्युत बॉक्स मधील फ्यूज बाहेर काढून विद्युत पुरवठा खंडित केला.

शॉक च्या झटक्याने अत्यवस्थ झालेल्या त्या मुलीला त्या दोन्ही तरुणांनी अलगद उचलून एका खाजगी डॉक्टरकडे नेऊन तिच्यावर प्रथमोपचार केले.त्यानंतर माहीम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.तिच्यावर उपचार केल्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिप्ती गायकवाड ह्यांनी सांगितले. वेळीच प्रसंगावधान दाखवीत त्या मुलीचे प्राण वाचविण्यात दोन्ही तरुणांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक केले आहे.

Web Title: Palghar: The youth showed the opportunity! The girl who was electrocuted was saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.