पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:11 PM2019-06-13T23:11:21+5:302019-06-13T23:11:47+5:30

मोठी हानी : वृक्ष, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाले, अनेक शहरे अंधारात

Palghar, Wada, Dahanu gas crush by vayu cylone | पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

पालघर,वाडा, डहाणूला वायूचा तडाखा

Next

पालघर : वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार होते मात्र या वादळाने आपली दिशा बदलली व ते पश्चिम दिशेला वळले असले तरी येत्या दोन दिवसात या वादळाने जिल्ह्यातील ११० किमीचा किनारपट्टीवरील भागाची मोठी वाताहत केली. अनेक घरांची पत्रे उडून विद्युत पोल कोसळून पडल्याने अनेक गावांना अंधारात रहावे लागले.

वायूच्या फटकाºयाने समुद्राची पातळी वाढली असून किनारपट्टीवरील अनेक गावांतील घरांना समुद्राच्या लाटांनी धडका द्यायला सुरुवात केली आहे. समुद्रात ६ मीटरच्या उंच लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारामध्ये एकच घबराट पसरली असून आपली घरे वाचविण्यासाठी वाळूची पोती आडोसा म्हणून घरांना लावण्यात मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. सातपाटी, वडराई, मुरबे, सफाळे, शिरगाव, माकूणसार आदी गावातील घरांची पत्रे उडून गेली ६० ते ७० कि.मी. प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. सफाळे उपविभागांतर्गत माकूनसार खाडी परिसरात एक एचटी पोल व एक डीपी स्ट्रक्चर बुधवारी रात्री पडल्याने आजूबाजूची अनेक गावातील ३ हजार ८०० ग्राहक अंधारात सापडले होते. विद्युत वितरण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या पाण्याचे नियोजन करीत हे काम गुरुवारी पूर्ण करीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.

या चक्र ीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला बसून गुजरातकडे जाणाºया ७० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे वादळ प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर असले तरी किनारपट्टी लगत असलेल्या भागातील गावात याचा धोका पाहता, खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असले तरी सध्या पावसाळी मासेमारी बंदी असल्याने सर्व बोटी किनाºयावर पडून आहेत. दुपारनंतर नुकसानीचा अंदाज घेतला जात होता.

वसई पूर्व भागात पहिल्या पावसातच विजेचा खेळखंडोबा
च्पारोळ : वसई ग्रामीण भागात पहिल्या तुरळक पावसातच बुधवार व गुरुवार या दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिक हैराण असून वीज मंडळाचा गलथन कारभार समोर आला असून मान्सून पूर्व तयारी का झाली नाही असा असा प्रश्न या भागातील नागरीक विचारत आहेत.

च् पारोळ, शिरवली, आडणे, भाताणें, खानिवडे, कोपर, सायवन, वडघर, करजोन, देपिवली, उसगाव, चांदीप, मांडवी, शिरासाड, इ.गावातील वीजपुरवठा खंडित झाला. बुधवार, गुरु वार दोन दिवस वीज गायब झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.

च् या भागातील कारखानदार, दुकानदार, रिसॉर्ट व इतर छोट्या मोठ्या व्यावसायीकांना मोठा फटका बसला मोठा आईस्क्रीमचा साठा व्यावसायिकांनी दुकानात ठेवला असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच विजेवर चालणारे पाण्याचे पंप बंद झाल्याने पाणीटंचाईला ही सामोरे जावे लागले.

वादळीवाºयांनी झोडपले
बोर्डी : वायू चक्र ीवादळाचा परिणाम १२ व १३ जून या दोन दिवसात डहाणूत दिसला. वादळीवाºयाचा जोर वाढल्याने थोड्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी पाऊस आणि जोराच्या वाºयाला प्रारंभ झाला. मात्र सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली, तरी वादळी वाºयाचा वेग गुरु वारी सायंकाळपर्यंत वाढतच गेला.
 

Web Title: Palghar, Wada, Dahanu gas crush by vayu cylone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.