पालघरला आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार
By Admin | Published: April 10, 2017 05:20 AM2017-04-10T05:20:18+5:302017-04-10T05:20:18+5:30
जिल्ह्याचा सर्वोत्तम विकास साधण्यासाठी आराखडा तयार करून आम्ही कामाला लागलो आहोत
पालघर: जिल्ह्याचा सर्वोत्तम विकास साधण्यासाठी आराखडा तयार करून आम्ही कामाला लागलो आहोत पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाची जाणीव असून एक आदर्श म्हणून हा जिल्हा नावारूपाला येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा ह्यांनी टेम्भोडे येथे बोलतांना दिली.
येथील श्री ग्रामदेवता भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा आज पालक मंत्र्यांच्या हस्ते पार पडला. ह्यावेळी खासदार चिंतामण वनगा, आमदार अमित घोडा, विलास तरे, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, प्रशांत पाटील, केतन पाटील, सुभाष पाटील, अनिल गावड, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी एकजुटीने एकत्र येऊन एका सुंदर मंदिराची उभारणी करून धार्मिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व व्यवस्था उभारणीचे काम हाती घेतले असून सर्वांच्या सहकार्याने आपण एक चांगला जिल्हा म्हणून पालघरला नावारूपाला आणू असा विश्वास त्यांनी ह्यावेळी व्यक्त केला. शुक्र वारी १०८ कलशांची जल यात्रा काढण्यात आली. शनिवारी जलपूजन, कलशपूजन, गणेश पूजन, शिखर ध्वजारोहण, देवता पूर्णसंस्कार, किर्तन, महाप्रसाद, तर शनिवारी पालक मंत्र्यांच्या हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ह्यावेळी मंदिर लोकार्पण करून देणगीदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. (वार्ताहर)