Palghar: झुकझुक गाडी ब निघाले आणि हरवले, हरवलेली तिन्ही मुले वाणगावला सापडली  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 10:57 AM2023-06-25T10:57:04+5:302023-06-25T11:00:29+5:30

Palghar: वाणगाव रेल्वेस्थानकानजीक तीन लहान मुले रडत असल्याचे स्थानिक शेतकरी पंकज राऊत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या मुलांची चौकशी केली असता बोईसर एवढाच पत्ता ते सांगून रडत होते

Palghar: Zukzuk car B left and lost, all three missing children found in Wanggaon | Palghar: झुकझुक गाडी ब निघाले आणि हरवले, हरवलेली तिन्ही मुले वाणगावला सापडली  

Palghar: झुकझुक गाडी ब निघाले आणि हरवले, हरवलेली तिन्ही मुले वाणगावला सापडली  

googlenewsNext

पालघर -  वाणगाव येथील आसनगावनजीक तीन अनोळखी लहान मुले हरवल्याने रडत होती. स्थानिकांना हे कळल्यावर त्यांनी वाणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या निदर्शनास आणून दिले. 'जनसंवाद'च्या माध्यमातून आवाहन केल्यावर पालकांचा शोध घेऊन तिन्ही मुले पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. झुकझुक गाडी बघायची म्हणून बोईसरहून ती वाणगावला पोहोचल्याचे तपास केल्यावर स्पष्ट झाले.

वाणगाव रेल्वेस्थानकानजीक तीन लहान मुले रडत असल्याचे स्थानिक शेतकरी पंकज राऊत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या मुलांची चौकशी केली असता बोईसर एवढाच पत्ता ते सांगून रडत होते. त्यांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिस अधीक्षकाच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विविध जनसंवाद ग्रुपवर त्या मुलांची माहिती प्रसारित केली गेली. त्यानंतर ही मुले बोईसर येथील असल्याचे आणि आई- वडील रोजंदारीसाठी घराबाहेर पडल्यावर झुकझुक गाडी (ट्रेन) बघण्याच्या बहाण्याने बोईसर स्थानकातून वाणगाव (आसनगाव) येथे पोहोचल्याचे चौकशीअंती कळले. कन्हैया हरिनिवास प्रसाद (७), कृष्णा हरिनिवास प्रसाद (६). शहाबाद सलमान साई (५), हे तिघेही बोईसर येथील गणेशनगर भागात राहत असल्याचे समोर आल्यावर त्यांना त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. जागरूक नागरिकांमुळे पुढचा अनर्थ टळला असला तरी पालकांनी आपल्या मुलाची काळजी घ्यावी असे आवाहन कहाळे यांनी केले आहे.

Web Title: Palghar: Zukzuk car B left and lost, all three missing children found in Wanggaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.