पालघरची उमेदवारी श्रीनिवासनेच नाकारली - ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:19 AM2019-04-05T05:19:27+5:302019-04-05T05:20:22+5:30

शिवसैनिक नाराज : जव्हार, मोखाड्यात साधला धावता संवाद ; कार्यकर्त्यांची प्रदीर्घ काळ झाली रखडपट्टी

Palghar's candidature was rejected by Srinivasan - Thackeray | पालघरची उमेदवारी श्रीनिवासनेच नाकारली - ठाकरे

पालघरची उमेदवारी श्रीनिवासनेच नाकारली - ठाकरे

Next

जव्हार : मागची पोटनिवडणुकीत एकदम वेगळी होती आणि आताची निवडणूक वेगळी आहे पालघरची जागा मी श्रीनिवास वनगा साठीच मागून घेतली होती मात्र तो मातोश्रीवर आला त्याने सांगितले की मला राज्यात राहायचे आहे मला अजून बरच शिकायचे आहे यामुळे आत्ताच मला दिल्ली म्हणजेच खासदारकी नको यामुळे निवडणूक जाहीर झालेली नव्या उमेदवाराचा शोध घ्यायचा कोठे याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांनी त्यांची जागा तर दिलीच मात्र उमेदवारही दिला यामुळे ही जगातील एकमेव अशी युती ठरेल असे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जव्हार- मोखाडा येथे केले.

सेनेकडून राजेंद्र गावीत यांच्या प्रचारार्थ संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रात्री उशिरा ते जव्हार, मोखाडा आणि खोडाळ्याच्या दौऱ्यावर होते जव्हार पोलिस स्टेशनसमोर शिवसेना कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी ठाकरे यांनी ही माझी निवडणूक काळातील शेवटची भेट असून आता प्रचाराची धुरा तुम्हीच सांभाळायची असून गावीत यांना निवडून आणायचे आहे, असे आवाहन केले.

गावितांना पहिला झटका
च्कॉंग्रेसमधून भाजप आणि भाजप मधून आता शिवसेनेत आलेले गावीत यांच्याबद्दल याभागात प्रचंड नाराजी आहे मुळात भाजपकडुन निवडून आल्यानंतर त्यांनी जव्हार-मोखाडा तालुक्यात अजिबात लक्ष नाही दिले अशी तक्र ार येथील भाजप कार्यकर्ते नेहमीच करत होते.
च्मात्र मोखाड्यातील संवाद दौºयात शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मंचावरच गावीत यांना उद्देशून सांगताना आपण या भागात लक्ष दिले नाही देत नाही असे आम्हाला भाजपवाल्यांनी सांगितले आहे यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करू नका जव्हार-मोखाडा छोटा वाटत असला तरी आम्ही जास्त त्रास देणारे आहोत असे सांगताच गर्दीतून हशा पिकला आणि पक्षबदलु गावीतांची पहीली विकेट मोखाड्यातून पडल्याची चर्चा रंगली असून अजून एकूण प्रचारात याबाबत विरोधकांबरोबरच स्वकीयही किती सुनावणार आहेत याचा अंदाज गावीताना आला असेल हे नक्की.

Web Title: Palghar's candidature was rejected by Srinivasan - Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.