पालघरच्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:41 PM2019-02-25T22:41:27+5:302019-02-25T22:41:32+5:30
उच्च न्यायालयात याचिका : नगर परिषदेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी
- हितेन नाईक
पालघर : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत असलेल्या त्रुटी, प्रभाग निहाय मतदारांची सदोष असलेली संख्या आदी बाबत राज्य निवडणूक आयोगा कडे तक्र ार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नगरपरिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
पालघर नगर परिषदेच्या अनेक विद्यमान नगरसेवकासह माजी नगरसेवक भावानंद संखे याचे नावच मतदार यादीतून गायब करण्याचा प्रकार एका अज्ञात व्यक्तीने केल्याचे समोर आले होते. या बाबत सायबर क्र ाईम अन्वये गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक विभागा कडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेण्याचे स्वारस्य ना तहसीलदार कार्यालय, निवडणूक विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रारूप मतदार यादी १४ फेब्रुवारी प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना ती यादी उशिराने प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ही यादी राजकीय पक्ष व मतदारांना दोन दिवसानंतर देण्यात आल्याची तक्र ार नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्या कडे केली होती.
प्रारूप मतदार यादीत अनेक घोळ असून काही प्रभागात १ हजार ४०० मतदार तर अन्य प्रभागात ४ हजारापेक्षा जास्त मतदारांची संख्या असल्याचे दिसून आले आहे. तर प्रभागाची अदलाबदल ही करण्यात आली असून मतदारांना या याद्याची पाहणी करून आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ वाढवून देण्याची जिल्हाधिकाºया कडे केलेल्या मागणीचाही विचार केला नव्हता.
नगर परिषदेच्या प्रारूप याद्या बनविताना काही लोकांच्या फायद्यासाठी प्रारूप मतदार यादी बनविण्यात आल्याचा आरोप ही नगराध्यक्षानी तक्र ारीत केला होता. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी बाबत हरकत घेण्यासाठी १८ फेब्रुवारी पर्यंत दिलेली मुदत पुरेशी नसल्याची मागणीही पिंपळे यांनी करून अनेक चुका, त्रुट्या असलेली यादी प्रसिद्ध करणाºया अधिकाºयावर कारवाईची मागणी ही त्यांनी केली होती. कारण यात अनेक त्रुटी असलेल्या मतदार यादीचा वापर निवडणुकीत झाल्यास त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागून आपल्या जिंकण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून आपला स्वार्थ साधणाºया लोकांना याचा फायदा होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या प्रारूप मतदार यादी बाबत अनेक तक्रारी करूनही जिल्हा निवडणूक विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बोगसपणाबद्दल नगराध्यक्षांचेच आरोप
मासवण आणि सागावे या भागातील अनेक लोकांची नावे पालघरच्या मतदार यादीत बोगसपणे घुसविण्यात आल्याचा दावा नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केला असून याची तसूभरही कल्पना ग्रामीण भागातील लोकांना नाही. या गंभीर बाबी घडवून आणण्यात पालघर पूर्वे कडील वेवूर भागातील काही व्यक्ती या बोगस याद्या बनविण्या मागे आहेत.
असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. नगरपरिषदेच्या बाहेरच्या अनेक लोकांची नावे प्रारूप यादीत बोगसपणे नोंद करणे,विद्यमान नगरसेवकांची नावे गायब करण्याचा प्रयत्न करणे ह्या गंभीर बाबी विरोधात सायबर गुन्हा दाखल करावे ह्या मागणी कडेही जिल्हाधिकार्या कडून गंभीर पणे घेतले जात नसल्याची बाब ही समोर आली आहे.
बोगस नावे घुसवून कपटाने जिंकून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत लोकशाहीचा गळा घोटणार्या लोकांची, अधिकार्यांची बिंग बाहेर पडण्यासाठी सायबर गुन्हा दाखल करण्यात यावा.
- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघर नगरपरिषद