पालघर जिल्ह्याचे औद्योगिक भवितव्य उज्ज्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:30 AM2017-08-01T02:30:27+5:302017-08-01T02:30:27+5:30
आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे
आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे किंवा अपेक्षे इतका जिल्ह्याचा विकासाचा गाडा जात नसला तरी सकारात्मक दृष्टीने घेण्यांत येणारे निर्णय व पोषक वातावरणामुळे सर्व बाबी बरोबर च उद्योगाच्या विकासालाही चालना मिळत असून मुबई आणि गुजरात च्या मध्यभागी असलेल्या पालघर जिल्ह्याचे उद्योग क्षेत्रातिल भविष्य उज्वल आहे परंतु त्या करीता अधिक पायभूत सुविधा जलद गतीने उपलब्ध करून संबंधित कार्यालये सुरु करण्याची नितांत गरज आहे
आठ तालुके मिळून देशाच्या व राज्याच्या नकाशावर उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यामधे महाराष्ट्रातील अग्रगण्य समजली जाणारी तारापुर एम आय डी सी, देशातील महत्वाचा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा तारापूर अणूऊर्जा केंद्रातील चार अणुभट्या, भाभा अणू संशोधन केंद्र ( बी ए आर सी) डहाणूचा रिलायन्स एनर्जीचा प्रकल्प व फुगे उद्योगाबरोबरच पालघर, वसई, वाडा, या सर्व तालुक्यांमध्ये लहान, मध्यम व मोठ्या स्वरूपाचे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. मासेमारी, शेती, बागायती, वीटनिर्मित, बांधकाम साहित्य पुरवठादार इत्यादी व्यवसायांमध्ये आज लाखो कामगार काम करीत आहेत
जिल्हा निर्मिती नंतर तसेच येणाºया काळा मध्ये मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरण, नवीन रस्त्यांच्या बांधणीचे नियोजन, कापड (टेक्सटाइल्स) उद्योगाला आवश्यक असणाºया कौशल्याचे कामगारांना देण्यात आलेले प्रशिक्षण त्यामुळे भाविष्यात निर्माण होणारे मिळणारे कुशल मनुष्यबळ जिल्ह्यामधे दुसरी एमआयडीसी उभारण्याबाबतची चाचपणी, नव्याने येवू पाहणारा केळवा येथील विमान उद्योग या सर्व आशादायी घटनांमुळे पालघर जिल्ह्याचे औद्योगिक महत्व वाढणार आहे हे निश्चित आहे.
नव्याने जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक व रासायनिक
कारखान्यांच्या तपासणीकरीता स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीमुळे प्रदूषण व औद्योगिक अपघातावर नियंत्रण येइल, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे कार्यालय स्थलांतरित करण्या साठी घेतलेला पुढाकार, कामगार विभागाचा घेण्यांत येणारा सकारात्मक आढावा, तारापूर एम आय डी सी चा नियोजनबद्ध विकासाचा घेतलेला ध्यास या बाबी उद्योगवाढीसाठी महत्वपूर्ण आहेत.
दुर्गम भागातील रोजगारांसाठी कुटुंबासह स्थलांतरीत होणारी आदिवासी कुटुंबे व त्यामुळे उदभवणाºया समस्या दूर करण्याकरीता त्यांंना त्यांच्या गावातच फळ, भाज्या, मोगरा, कुक्कुटपालन ई. व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देवून त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक कालबध्द कार्यक्र म जिल्हास्तरावरून आखला जातो आहे तो आशादायी असा आहे. फक्त त्याला योग्य नियोजनाच्या अंमलबजावणीची गरज आहे.
-पंकज राऊत, बोईसर