पिंजाळ नदीवरील पाली बंधाऱ्याला गळतीचा फटका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:17 PM2020-01-17T23:17:47+5:302020-01-17T23:17:54+5:30
भाजीपाला लागवड केलेला शेतकरी चिंतातुर
वाडा : तालुक्यातील पिंजाळ नदीवरील पाली येथे असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून बंधाºयातील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. काही दिवसातच हा बंधारा कोरडा पडण्याची भीती आहे. याचा फटका आजुबाजूच्या गावातील नळयोजना आणि भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.
वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून वाहणाºया पिंजाळ नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. काही ठिकाणी जुने झालेले बंधारे तर काही ठिकाणी निकृष्ट बांधकामामुळे हे बंधारे निकामी झाले आहेत. याचा फटका अनेक गावांना आणि शेतकºयांना बसत असून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाºया पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्याचा अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या पाण्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी भाजीपाला लागवड केली आहे. मात्र, बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे बंधाºयातील पाणी काही दिवसांतच पूर्णपणे खाली होणार आहे. अजूनही पावसाळा येण्यासाठी पाच महिने बाकी आहेत. जर बंधाºयाची गळती थांबली नाही, तर बंधारा पूर्ण कोरडा पडून पाण्याअभावी लावलेला भाजीपाला जळून जाणार असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आधीच संकटात असलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि लघू पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष देऊन या बंधाºयाची दुरूस्ती करून होणारी पाण्याची गळती थांबवण्याची मागणी शेतकरी आणि नागरिक करत आहेत. पाली येथील पिंजाळ नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला २८ दरवाजे असून ते पावसाळ्यानंतर लोखंडी प्लेट टाकून बंद केले जातात. मात्र, या सर्व दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती राहते. या प्लेट रबराने बंद करावयाच्या असतात.
पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. मात्र बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे या बंधाºयातील पाणी पूर्णपणे खाली होणार आहे. या गळतीमुळे काही दिवसांतच बंधारा कोरडा पडेल. त्यामुळे आम्हा शेतकºयांसाठी पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ही गळती थांबवावी आणि आम्हा शेतकºयांना दिलासा द्यावा. - सागर सालकर, शेतकरी
या बंधाºयाचे गेट चांगल्या प्रकारे बसविण्यात आले होते. मात्र वाळूमाफिया हे बंद केलेले गेट उघडत असल्याने पाणी वाया जात आहे. याबाबत आम्ही तहसीलदार आणि पोलीस कार्यालयात लेखी पत्र दिले आहे. तसेच बंधाºयाच्या दुरूस्तीचे काम काढण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने ते काम केलेले नाही. यंदा हे दुरुस्तीचे काम केले जाईल. - एम.आर.पाटील, लघु पाटबंधारे विभाग