भाईंदरमध्ये इमारतीजवळ आग लागल्याने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 07:17 PM2021-02-11T19:17:02+5:302021-02-11T19:17:11+5:30
भाईंदर पूर्वेच्या विमल डेअरी मार्गावर शिर्डीनगरच्या पाठीमागच्या बाजूस मोकळ्या भूखंडात पडलेल्या कचरा व अन्य पडीक साहित्याने गुरुवारी दुपारी एक च्या सुमारास पेट घेतला .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरारोड मध्ये गॅस सिलेंडर स्फोटांच्या मालिकेची घटना ताजी असतानाच भाईंदर मध्ये गुरुवारी एका इमारती लगत मोकळ्या भूखंडातील कचरा व पडीक साहित्याला मोठी आग लागली .
भाईंदर पूर्वेच्या विमल डेअरी मार्गावर शिर्डीनगरच्या पाठीमागच्या बाजूस मोकळ्या भूखंडात पडलेल्या कचरा व अन्य पडीक साहित्याने गुरुवारी दुपारी एक च्या सुमारास पेट घेतला . आगीच्या ज्वाळा चार मजली इमारतीच्या र पर्यंत पोहचल्या . आगीचा भडका उडाल्याने इमारतीतील रहिवाश्यां मध्ये घबराट माजली .
महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान राजेश म्हात्रे, संतोष गीते, संतोष मासाळ, संदीप कोकरे आदींनी दोन अग्निशामक वाहनांच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली . आगीत इमारतीतील सदनिकांच्या खिडकीच्या काचाचे व वायरिंगचे नुकसान झाले आहे असे रहिवाश्यांनी सांगितले . .