पारगांव पूल दोन दिवस बंद; अवजड वाहतूक स्थगित, सार्वजनिक बांधकाम खाते निष्क्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:47 AM2018-07-06T03:47:55+5:302018-07-06T03:48:04+5:30

मागील ४ वर्षापासून पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला वैतरणा नदीवरील पारगाव पूलाची दुरुस्ती आजही पूर्ण करण्यात आलेली नाही.

 Pargaon bridge closed for two days; Suspended heavy traffic, disable the Public Works Department | पारगांव पूल दोन दिवस बंद; अवजड वाहतूक स्थगित, सार्वजनिक बांधकाम खाते निष्क्रिय

पारगांव पूल दोन दिवस बंद; अवजड वाहतूक स्थगित, सार्वजनिक बांधकाम खाते निष्क्रिय

Next

- हितेंन नाईक/निखिल मेस्त्री

पालघर/चहाडे : मागील ४ वर्षापासून पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला वैतरणा नदीवरील पारगाव पूलाची दुरुस्ती आजही पूर्ण करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदारावर कुठलाही अंकुश राहिला नसून आता पाहणीसाठी हा पूल ९ व १० जुलै रोजी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार व बेजबाबदार ठेकेदार यांच्यामुळे हा पूल गेल्या चार वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे. माहीम, केळवे, एडवण, माकूणसार, दातिवरे, कोरे या प्रमुख गावासह परिसरातील अनेक छोटी-मोठी गावे, पाडे या पुलाद्वारे मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडली गेल्यामुळे हा पूल सर्वासाठी सोयीचा ठरला आहे. तो दुरु स्तीच्या नावाखाली बंद असल्याने वाहतूक बंदीचा मोठा फटका या गावांतील विद्यार्थी, कामगार, पर्यटक, भाजीपाला उत्पादक, दूध विक्रेत्यांसह एसटीलाही बसतो आहे.
वैतरणा नदीवर असलेल्या या पुलालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रेती उत्खननाचा फटका ह्या पुलाला बसून मोठा धोका निर्माण झाला होता. पुलाच्या आधार खांब क्रमांक ५ ला तडा जाऊन त्याचा बेअरिंग पॅड बाहेर येऊन तो एका बाजूला झुकला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल २९ डिसेंबर २०१४ पासून दुरुस्तीच्या कामासाठी अवजड वाहतुकीकरिता बंद ठेवला होता.या पुलाच्या दुरु स्तीसाठी १२ कोटी ५० लाख ३ हजाराचा ठेका अजय पाल मंगल आणि कंपनी या ठेकेदाराला देण्यात आला. मात्र त्याचे अयोग्य नियोजन आणि कामचुकारपणामुळे त्याच्या दुरु स्तीचे काम आज पर्यंत रखडले होते. ह्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसून परिणामी येथील लोकांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. सर्वसामान्य लोकांची होत असलेली गैरसोय पाहता केळवे रोड येथील हितेश सावे यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत हा पूल डिसेंबर २०१७ पासून पूर्ववत सुरु करण्याचे नियोजन असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने म्हटले होते.
मात्र तरीही हा पूल सुरु होत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा तो वाहतुकीसाठी कधी खुला होणार, ठेकेदारांच्या विरोधात कारवाई झाली आहे का? असे प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने या अधिकाराला उत्तर देत हे काम ३० जून २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून ठेकेदाराला दर दिवसाकाठी विभागामार्फत दंड आकारला जात असल्याचे उत्तर मिळाले आहे. आता जुलै सुरू झाला तरी हे काम अपूर्ण आहे.

- २ जुलै रोजी ग्रामपंचायतीस सार्वजनिक बांधकाम खात्याने पाठविलेल्या पत्रात या पुल दुरु स्तीचे काम व त्याची चाचणी व्हीजेटीआयमार्फत ९ व १० जुलै रोजी होणार असल्यामुळे तो बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.मात्र ह्या ठेकेदाराला कुठलाही दंड ठोठावण्यात आला नसून त्याला काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे समजते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांचे संबंध किती जिव्हाळ्याचे आहेत. हे स्पष्ट होते. त्यामुळे खरे कोण असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

पारगावच्या पुलाची दुरूस्ती करण्यासाठी चार वर्षापेक्षा जास्त कालावधी लागावा ही सार्वजनिक बांधकाम विभागासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मागची चार वर्ष अवजड वाहनांना लांबच्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने इंधनाचा मोठा अपव्यय झाला आहे. चार वर्षात परिसरातील लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कंत्राटदाराकडुन वसूल करणार का?
-हितेश सावे, माहिती कार्यकर्ता

मागची चार वर्ष अवजड वाहनांना पारगाव च्या पुलावरु न बंदी असल्याने आमच्या गावाशी असलेला एसटीचा संपर्क तुटला आहे. रिक्षा अपुºया असल्याने रोज प्रवास करणारे नोकरदार, भाजी विक्र ेते शेतकरी, आणि विद्यार्थ्यांना रिक्षा मिळवण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. ग्रामस्थांनी पूल दुरु स्त होण्याची आशा सोडून कंटाळून सफाळे स्टेशनचा वापर सुरू केला आहे.
- हेमा राजकुमार पाटील, ग्रामस्थ,पारगाव

व्हिजेटीआयचे अधिकारी दोन दिवस पुलाची पाहणी करणार असून त्यांनी हिरवा कंदील दाखविल्या नंतर हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
-महेंद्र किणी, अभियंता,
सां. बां. विभाग, पालघर

Web Title:  Pargaon bridge closed for two days; Suspended heavy traffic, disable the Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.