सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:57 PM2021-01-13T13:57:42+5:302021-01-13T13:57:49+5:30

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे .

Passengers are in dire straits due to the beautification work | सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल 

सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीर भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील नियोजनशून्य सुशोभीकरणाच्या भोंगळ कामा मुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत . त्यामुळे उंच बांधलेले सदर बांधकाम काढून रेल्वे स्थानकात तसेच तिकीट खिडकी कडे जाण्याचे मार्ग पूर्ववत करा अशी मागणी प्रवाश्यांनी करत संताप व्यक्त केला आहे . 

 

भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे . त्या नुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हल पेक्षा सुमारे चार ते ५ फूट उंचीचा पाया बांधला आहे . सदर बांधकामा मुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे . त्यातच रिक्षा उभ्या रहात आहेत जेणे करून प्रवाश्याना तिकीट घराकडे जाणे सुद्धा जिकरीचे झाले आहे . एमबीएमटी , एसटी , बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमा सह खाजगी बस , रिक्षा , खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये - जा ह्याच उत्तरेकडच्या भागातून होत असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे . 

 

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचाच एकमेव भाग आहे . त्यामुळे   

भाईंदर रेल्वे स्थानकातून  पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरे कडे आणि मध्य भागातील मोठा जिना देखील उत्तरे कडेच उतरतो . त्यामुळे ह्या तिन्ही जिन्याने ये - जा करणारे हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच बाहेर पडतात . 

 

सुशोभीकरणाच्या ह्या ये - जा करण्याचा एकच मार्ग शुल्क राहिला असून तो देखील अतिशय अरुंद असल्याने कोणती दुर्घटना - अपघात घडल्यास बाहेर पडायला प्रवाशांना मोकळा असा दुसरा मार्गच राहिलेला नाही . त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एल्फिस्टन सारखी घटना घडू शकते . 

 

मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानका पासून १५० मीटर अंतर पर्यंत फेरीवाले सुद्धा बसू देऊ नका असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामा मुळे प्रवाश्याना प्रचंड अडथळा होत आहे . शिवाय फेरीवाले व दुचाकी यांचे अतिक्रमण आणखीनच जाचक ठरले आहे . 

 

सुशोभीकरण चे काम उंच झाल्याने तिकीट घर व लगतचा जिना सखल झाला आहे . त्यामुळे तिकीट काढण्यासाठी आधी वर चढून मग तिकीट घरात जाण्यासाठी खाली उतरावे लागते . तर सुशिभिकरणाच्या बांधकामा लगतचा एकमेवर मार्ग तर खूपच अरुंद असून सर्वच प्रवाश्यांची ये - जा ह्याच ४ - ५ फुटाच्या मार्गातून करावी लागते . त्यातही मध्ये लोखंडी खांब लावलेले असून आता तर दुचाकी व फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाट काढणे प्रवाश्याना जिकरीचे झालेले आहे . वृद्ध , महिलांचीच नव्हे तर पुरुषांची सुद्धा दमछाक होते . 

 

दिनेश उले ( प्रवासी ) - या ठिकाणी ८ कोटी खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्या पेक्षा येथे नागरिकांना प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे . रेल्वे स्थानकात पश्चिमे कडून ये - जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तो देखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे . अव्यवस्था करून  प्रवाश्याचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का ? येथील सर्व बांधकाम काढून पूर्वी सारखा परिसर मोकळा करा . 

Web Title: Passengers are in dire straits due to the beautification work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.