पालघर जिल्ह्यात पडीक जमिनीवर सोप्या प्रक्रियेने पिकविले मातीतून मोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:47 PM2018-05-29T23:47:51+5:302018-05-29T23:47:51+5:30

या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासीबहुल भाग, मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप आणि जलसिंचनाचा अभाव

Pearl soil from pakewelly soil through easy processing on wetland in Palghar district | पालघर जिल्ह्यात पडीक जमिनीवर सोप्या प्रक्रियेने पिकविले मातीतून मोती

पालघर जिल्ह्यात पडीक जमिनीवर सोप्या प्रक्रियेने पिकविले मातीतून मोती

Next

पालघर : या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासीबहुल भाग, मोठ्या प्रमाणात होणारी जमिनीची धूप आणि जलसिंचनाचा अभाव, यामुळे येथील आदिवासी बांधवांना शेतीची कामे कवळ पावसाळी महिन्यांमध्येच करता येत होती. मात्र जेएसडब्ल्यू फाऊंडेशेनचे कर्मचारी आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी या आदिवासींच्या कमी उपजाऊ जमिनींवर सोपी प्रक्रिया केल्यामुळे या भागातील अनेक शेतकरी आता भाजीपाला उत्पादनाकडे वळत असून पडीक जमिनीच्या मातीतूनही मोती पिकवणे त्यांना शक्य होत आहे.
गेल्या काही वर्षांत जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने पालघर जिल्ह्यातील २००० हेक्टर पडीक जमिनीचा कायापालट घडवत ही जमीन उपजाऊ बनविण्यात यश प्राप्त केले आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या या प्रयत्नांमुळे तब्बल ७०० शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून केवळ अर्थाजर्नच नव्हे, तर या शेतकºयांच्या कुटुंबियांना आता सकस अन्न मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे.
जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्टÑ सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत या भागातील शेकडो अंगणवाड्यांमध्ये स्पिरुलिना लाडू व संतुलित आहार पुरवण्यापासून ते कुपोषित बालकांच्या संगोपनाकडे लक्ष ठेवण्यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. ‘ही कामे करत असतानाच येथील आदिवासी शेतकºयांच्या अडचणींकडे आमचे लक्ष गेले. यानंतर जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्यामुळे दुसरे पीक घेणे शक्य होत नसे. परिणामी या आदिवासींचा कल अन्य भागांत जाऊन शेतमजुरी करण्याकडे असे. यामुळेच त्यांच्या मुलांना सकस अन्न मिळणे मुश्कील होत होते. याचा थेट परिणाम कुपोषण वाढण्यात होत असल्याचे आमच्या लक्षात आले.’ असे फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिस्वदीप गुप्ता यांनी सांगितले.
जेएसडब्ल्यू फाऊंडेशन आणि इक्रेसॅट अर्थात (कउफकरअळ (कल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ उ१ङ्मस्र२ फी२ीं१ूँ कल्ल२३्र३४३ी ाङ्म१ ३ँी रीे्र-अ१्र िळ१ङ्मस्र्रू२ - ंल्ल ्रल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ ल्लङ्मल्ल-स्र१ङ्मा्र३ ङ्म१ँल्ल्र९ं३्रङ्मल्ल ३ँं३ ४ल्लीि१३ं‘ी२ २ू्रील्ल३्रा्रू १ी२ीं१ूँ ाङ्म१ ीि५ी’ङ्मस्रेील्ल३,) यांनी संयुक्तपणे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या भागात राज्य सरकारने २००१ मध्ये बांधलेल्या दोन बंधाºयांमधील गाळीव माती येथील काही शेतकºयांच्या जमिनीमध्ये मिसळली. या मातीचा सहा इंचाचा थर जव्हार तालुक्यातल्या कोगदा गावचे महादू भोये यांच्या शेतात मिसळण्यात आला. ‘ या मातीमुळे माझ्या जमिनीचा सुपीकपणा वाढला. एकेकाळी मी फक्त एकवेळ भाताचे पीक घेत होतो. मात्र आता भातापाठोपाठ मी वांगी, मिरच्या आणि तुरडाळीसारख्या कडधान्यांचेही पीक घेतो. याचा फायदा माझ्या कुटुंबाच्या पोषणात तर होतोच, पण मला आता वाढीव पीक बाजारात विकून चार पैसेही मिळतात,’ असे भोये सांगतात.
जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या भागातील तब्बल सहा हजार हेक्टर जमिनीचा कायापालट घडवतानाच शेकडो शेतकºयांना एकीकडे उत्पन्नाचा स्त्रोत देत या भागातील कुपोषणाची समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘याआधी आमची जमीन वाहून जायची. पण आता बांधावर लावलेली तूर तसेच नियंत्रित तापमानात लावलेल्या काकडी, धने, मेथी, कोथिंबीर, अशा भाजीपाल्याचा फायदा आमच्या कुटुंबाला भोजनात तर होतोच पण आम्हाला त्याची विक्रीही करता येते’ असे या परिसरात राहणाºया माथी काशीराम चौधरी, बेबी भुसारा आणि कुसुम रामचंद्र साठे या महिला शेतकºयांनी सांगितले.


२०१६ आणि २०१७ मध्ये सरासरी कृषी उत्पन्नात झालेली वाढ
पीक सध्याच्या पीकप्रक्रियेतून जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या
शेतकºयाला मिळत असलेले मदतीनंतर मिळालेले सरासरी
सरासरी उत्पन्न (किलो प्रति हेक्टर) उत्पन्न (किलो प्रति हेक्टर)
मूग ७६८ १२२४
भुईमूग ९१७ १२२४
भात २२७० २९२१
बाजरी १६३५ १८४३
पारवा वाटाणा १०८६ ७५७
ज्वारी १८४० २३०८

Web Title: Pearl soil from pakewelly soil through easy processing on wetland in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी