विक्रमगड तालुक्यातील आंब्याच्या झाडांना मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:17 AM2019-02-11T00:17:52+5:302019-02-11T00:17:59+5:30
गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे.
विक्रमगड : गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे. जर असेच वातावरण राहीले तर यंदा आंबा उत्पादन चांगले येण्याची शक्यता येथील आंबेघर मधील शेतकरी रावजी तुंबडा यांनी वर्तविली आहे.
विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा पीक बागायती शेतकरी घेतात़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर येत असता तरी गेल्या दोन-चार दिवसांपासून हवामानातील बदलामुळ े(थंडी कमी होऊन उष्णतेत वाढ झाली आहे) व काहीसे ढगाळ वातावण निर्माण होत असलेल्याने याचा परिणाम येणा-या मोहरावर होण्याची शेक्यताही शेतकरी वर्तवित आहे़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर आलेला असून आंबा हंगाम चांगल्या प्रकारे असून वर्षा आड येणाऱ्या बहराने बागायतदारांचे लक्ष या पिकांकडे लागले आहे़ यंदाचे थंडीचे प्रमाणही चांगले असल्याने व वातावरणही स्वच्छ असल्याने आंबा पिकांवर सध्याच्या मितीला कोणत्याही रोगाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही़
१८३ हेक्टरात लागवड
विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंब्यांचे उत्पादन घेतले जाते़ विक्रमगड येथील आंबा बागायदार, शेतकरी आंबेघर येथील संजय तुंबडा, रावजी तुंबडा विक्रमगड येथील महेशे पाटील, झडपोली येथील व्हीज़ी़पाटील, माण येथील कोरे, खुडेद येथील अनंद लक्ष्मण महाले आदी शेजकरी दरवर्षी लाखो रुपयांचे आंब्यांचे उत्पादन घेत असून फायदा मिळवत आहेत़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतक-यांचे म्हणणे असून आंबा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालेला आहे़