पालघर विधानसभा संघातील मतदार युतीच्या मागे भक्कमपणे उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:51 AM2019-05-26T00:51:49+5:302019-05-26T00:52:06+5:30

विधानसभेतील मतदारांनी १ लाख ११ हजार ७९४ मतांची भरभक्कम रसद पुरवीत सुरुवातीपासूनच आघाडी मिळवून देण्यात विजयाचा वाटा उचलला.

The people of Palghar assembly constituency stand firmly behind the alliance | पालघर विधानसभा संघातील मतदार युतीच्या मागे भक्कमपणे उभे

पालघर विधानसभा संघातील मतदार युतीच्या मागे भक्कमपणे उभे

Next

- हितेंन नाईक
पालघर : या लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या विजयी झालेल्या राजेंद्र गवितांना सेनेचा अभेद्य बालेकिल्ला असणाऱ्या पालघर विधानसभेतील मतदारांनी १ लाख ११ हजार ७९४ मतांची भरभक्कम रसद पुरवीत सुरुवातीपासूनच आघाडी मिळवून देण्यात विजयाचा वाटा उचलला. यामुळे येत्या विधानसभेत सेनेच्या उमेदवाराच्या विरोधात कुठल्याही पक्षाचा उमेदवार टिकाव धरू शकेल असे वाटत नाही.
पालघर लोकसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने युतीच्या नावाखाली भाजपकडून पालघर लोकसभा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून भाजपकडे असणारा विजयी मतदार संघ स्वत:साठी मागून घेतला. २०१८ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून लढणाºया श्रीनिवास वनगांना उमेदवारी मिळेल असे वाटत असतांना आपला प्रतिस्पर्धी असणाºया बहुजन विकास आघाडी या पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी, सीपीएम आदी महत्त्वपूर्ण पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याने त्यांच्या वाढलेल्या ताकदीला टक्कर देण्यासाठी श्रीनिवास वनगा हा चालणार नाही. अशी पक्की खात्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची होती. आणि केंद्रात पुन्हा युपीए सरकार स्थापन करायचे असेल तर एक एक खासदार महत्वाचा असेल त्यामुळे विरोधकांच्या तोडीचा उमेदवार आपल्याला उभा करावा लागेल, याची जाणीव असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेअंती भाजपचे खासदार राजेंद्र गवितांच्या हाताला शिवबंधन बांधण्यात येऊन शिवसेनेने त्यांची उमेदवारी घोषित केली. भाजपचा विजयी मतदार संघ शिवसेनेला देण्यात आल्याने भाजपमधून सुरू झालेले राजीनामा सत्र मुख्यमंत्र्यांनी वेळीच शमवले. तर दुसरीकडे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत ज्या राजेंद्र गवितांना नंदुरबारला पाठविण्याची ओरड केली त्यांनाच पुन्हा निवडून द्या असे कोठल्या तोंडाने मतदारांना सांगणार? हा शिवसैनिकांना पडलेला प्रश्न ज्या शिवसैनिकांनी केली होती त्यांनी पुन्हा आता आमच्या गवितांना निवडून द्या असे कोणत्या तोंडाने सांगायचे असा प्रश्न पडला होता. त्यामुळे शिवसैनिकात थोडी नाराजी होती. त्यामुळे भाजप व शिवसेनेत असणारी नाराजी भोवणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात असतांना केंद्रात व राज्यात असलेली सत्ता टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आ.फाटक यांनी दोन्ही पक्षातील नाराजांना समजावले. त्यामुळे दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले. पालघर नगरपरिषदेवर ही भाजप-सेनेची सत्ता आल्याने सर्व नगरसेवक कामाला लागले होते. पालघर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी असलेल्या जिल्हाध्यक्ष राजेश शहा, विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, तालुकाध्यक्ष विकास मोरे आदींनी संपूर्ण भाग पिंजून काढला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही जोमाने काम केले. विरोधकांना शिरकाव करण्याची संधीच दिली नसल्याने गवितांना या मतदारसंघातून तब्बल ६० हजार १०१ मतांची आघाडी मिळवून देण्यात यश मिळाले.
पालघर विधानसभा मतदार संघात मच्छीमारांचे असलेले हद्दीचे वाद, डिझेल अनुदान परताव्याची कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम, बुलेट ट्रेन, जिंदाल ेजेट्टीला मिळालेली परवानगी, वाढवण बंदर, प्रदूषण आदी अनेक प्रश्नांबाबत स्थानिकांनी उध्दव ठाकरेंना लक्ष घालण्याची विनंती केली.२०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढले होते. भाजपकडून लढणाºया राजेंद्र गवितांना पालघर विधानसभा मतदार संघातून ५६ हजार २१५ तर सेनेच्या श्रीनिवास वणगांना ५४ हजार ४५३ मते अशी एकूण १ लाख १० हजार ६६८ मते मिळाली होती. यावेळी भाजप-सेना एकत्र लढल्यानंतर त्यांना एकूण १ लाख ११ हजार ७९४ इतकी मते मिळाली.

Web Title: The people of Palghar assembly constituency stand firmly behind the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.