जव्हारची लोकसंस्कृती अन् जाती व्यवस्था झाली शब्दबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:09 AM2018-04-04T06:09:46+5:302018-04-04T06:09:46+5:30
येथील जव्हार संस्थानाचा उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवादशीलपणे लिखाण केलेले ‘जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोध यात्रा’ आणि ‘जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
- हुसेन मेमन
जव्हार - येथील जव्हार संस्थानाचा उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवादशीलपणे लिखाण केलेले ‘जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोध यात्रा’ आणि ‘जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा’ अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.
संस्थानाची ऐतिहासिक माहिती या तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतीक आणि जव्हारच्या लोकसंस्कृतीचे विविध पैलू मुकणे यांनी उलगडून दाखिवले आहे. त्यांचे प्रकाशन शुक्र वारी गांधी चौक येथील जुन्या नगरपरिषद कार्यलयात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये ‘जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोध यात्रा’ या खंडामध्ये संस्थान कालीन पार्श्वभूमीचे लिखाण केले असून, यामध्ये जव्हार संस्थानातील गड किल्ले, राजवाडे, गडी, इथली वारली कला, आदिवासी नृत्य, तारपा नृत्य, स्त्री-पुरु षांचा एकमेकांच्या कमरेभोवती हातांचा वेटोळे घालून लयबध्द पदन्यास, नृत्य, विविध फुलमाळांच्या वेण्यांनी सजविलेला केशसंभार, संगीत वाद्यांचा व तारप्याचा मद्यधुंद करणारा सवरध्वनी संगीताचा अविष्कार यावर लिखाण केले आहे.
जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा या खंडामध्ये तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतिक, आणि जव्हारचा गणपती, ग्रामदेव, शिवमंदिर, जागृतदैवत खंडोबा तसेच राजदरबारी दसरा आणि ढोल नृत्य, तारपा नृत्य, बोहाडा नृत्य, तसेच आदिवासींच्या पोट जाती वारली, कोकणा, क. ठाकूर, म.ठाकूर, कातकरी, ढोरकोळी, महादेव कोळी या विषयांवर विस्ताराने प्रकाशझोत टाकून मार्मिक शब्दात लिखाण केले आहे. प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी लिखाण करण्यासाठी गेली चार वर्ष मुकणे यांनी माहिती गोळा लिखाण केले.
या दोन्ही ग्रंथरुपी पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ महासंचालक गो. ए. सोसायटीचे संचालक डॉ. म. स. गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, अॅड. वासुदेव गांगल, जव्हार न. पा. नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, संदीप वैद्य, डॉ. प्रा. श्रीनिवास जोशी अन्य मान्यवर, नागरिक सोहळ्यासाठी उपस्थित होते.