पिंपळशेत, खरोड्यातील हिरवी मिरची थेट परदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:34 PM2020-02-17T23:34:53+5:302020-02-17T23:37:53+5:30
अधिक भाव मिळणार : ४२ शेतकऱ्यांनी केली लागवड
हुसेन मेमन
जव्हार : पिंपळशेत, खरोंडा गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेली हिरवी मिरची यंदा युरोपियन देशात विक्रीसाठी जाणार आहे. या मिरचीचा पहिला तोडा २ टन निघण्याचा अंदाज आहे. यामुळे हिरव्या मिरचीची लागवड केलेले सर्व शेतकरी कामाला लागले असून, त्यांना युरोपियन देशात अधिक भाव मिळून आर्थिक फायदा होणार आहे. जिंदाल स्टील वर्क्स आणि इकीसेंट, हैद्राबाद रुरल कमुन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आर.सी. संस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पिंपळशेत, खरोंडा, हेदीचापाडा या गावातील एकूण ४२ शेतकºयांनी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. या मिरचीला अधिक उत्पन्न मिळावे आणि आदिवासी शेतकºयांचा फायदा व्हावा, या दृष्टीने आदिवासी भागात काम करणाºया संस्थांनी हे पाऊल उचलले असून, या मिरचीची युरोपियन देशात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
लागवड केलेली हिरवी मिरची निरोगी आणि चांगल्या प्रतीची निघावी म्हणून आर.सी संस्थेच्या टेक्निकल पद्धतीने वाफे, आळे तयार करून मिरचीची लागवड करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यात झाड वाढून मिरची तयार झाली आहे. या दोनच दिवसात ही तयार मिरची तोडून विक्रीसाठी युरोपियन देशात पाठविली जाणार आहे.
आदिवासी शेतकºयांची मिरची बाहेर देशात विकावी आणि त्या शेतकºयांना फायदा व्हावा, म्हणून हा वेगळा उपक्रम राबवत ही मिरची बाहेर पाठवण्याचा खर्च डेलमोंन्टे कंपनी उचलणार आहे. तसेच मिरचीला परदेशात चांगला भाव मिळवा, म्हणून मिरची विक्री आणि माल वाहतूक या सर्वांचा खर्च आर.सी. कंपनी करणार आहे.
शेतकºयांना होईल चार पटीने फायदा
या भागातील शेतकºयांना त्यांच्या शेतीचा फायदा कसा होईल आणि त्यांची प्रगतीही व्हावी, यासाठी आम्ही आदिवासी भागात काम करणाºया संस्थांनी वेगळा प्रयोग केला आहे. यंदा त्यांनी पिकवलेल्या हिरवी मिरचीला युरोपियन भाव मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. मिरची तयार झाली असून, दोनच दिवसात ही हिरवी मिरची बाहेर देशात विक्रीला जाणार आहे. यामुळे निश्चितच शेतकºयांना चार पटीने फायदा होईल, असा विश्वास संस्थांनी व्यक्त केला आहे.
हिरवी मिरची युरोपियन देशात विक्रीला जाणार असल्याचा आनंद आम्हाला अधिक आहे. यासाठी ज्या संस्थांनी आम्हाला मदत केली आहे, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. - विलास हांडवा, हिरवी मिरची शेतकरी