डुबी पद्धतीने रेती काढण्याची परवानगी रद्द करा

By admin | Published: November 16, 2015 11:45 PM2015-11-16T23:45:15+5:302015-11-16T23:45:15+5:30

वैतरणा नदीचे पात्र अतिखोलवर झाल्याने डुबी पद्धतीने रेती काढणे अशक्य आहे. त्यामुळे डुबी पद्धतीच्या नावाखाली महसूल खात्याने रेती काढण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी

Permission for sand dubbing | डुबी पद्धतीने रेती काढण्याची परवानगी रद्द करा

डुबी पद्धतीने रेती काढण्याची परवानगी रद्द करा

Next

मनोर : वैतरणा नदीचे पात्र अतिखोलवर झाल्याने डुबी पद्धतीने रेती काढणे अशक्य आहे. त्यामुळे डुबी पद्धतीच्या नावाखाली महसूल खात्याने रेती काढण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी जिल्हाधिकारी पालघर येथे केली आहे.
पालघर जिल्ह्यातील पूर्व भागात येणारे पारगाव, सोनावे, तांदूळवाडी, गिराळे, नावझे, विश्रामपूर, दहिसर व इतर बंदरांत वैतरणा नदीतून गेल्या अनेक वर्षांपासून रेतीउपसा झाला आहे. त्यामुळे नदीचे पात्र अतिखोल असल्यामुळे मजुरांकडून डुबी पद्धतीने रेती काढणे अशक्य आहे. आधुनिक पद्धतीने (सक्शन) पंपाद्वारे रेती काढू शकतो, परंतु डुबी पद्धतीने रेती काढण्याची परवानगी देऊ नये. त्याऐवजी सक्शन पंपाद्वारे रेती काढण्याची परवानगी मिळावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)

Web Title: Permission for sand dubbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.