उत्सवांसाठी आवश्यक परवानग्या एकाच विभागातून, वसई - विरार मनपाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:19 PM2019-08-12T23:19:09+5:302019-08-12T23:19:26+5:30

वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीत दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात.

Permissions required for the festivities from the same section, the decision of the Vasai-Virar Municipal Corporation | उत्सवांसाठी आवश्यक परवानग्या एकाच विभागातून, वसई - विरार मनपाचा निर्णय

उत्सवांसाठी आवश्यक परवानग्या एकाच विभागातून, वसई - विरार मनपाचा निर्णय

Next

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीत दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. या सण उत्सवात कोणत्याही प्रकारे कायद्याची बाधा येऊ नये, यासाठी त्याची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते.
सर्व प्रभाग स्तरावर आवश्यक दाखले आणि परवानग्या देण्याची सोय महापालिकेने केली असून पालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.

दरम्यान, श्रावण महिना सुरू झाला की, सण - उत्सव साजरे करण्यासाठी सार्वजनिक मंडळे, संघटना आदींना विविध प्रकारच्या परवानग्या लागतात. त्यातच महत्त्वाचे सण, उत्सव यामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, आणि नवरात्रोत्सव हे सार्वजनिक हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करताना काही बाबतीत महानगरपालिका, पोलीस, महसूल विभाग, महावितरण आदीची परवानगी अथवा ना हरकत दाखला आवश्यक असतो. तसेच दिवाळीसाठी फटाके विक्रीसाठीही वरील अस्थापनांचा दाखला आवश्यक असतो.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर आचारसंहिता सुरू होईल. अशा वेळी महानगरपालिकेचे बरेच कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होतील.

हे लक्षात घेऊनच यासाठी आधीच महानगरपालिकेने सर्व प्रभाग स्तरावर या सणांसाठी आवश्यक दाखले व परवानग्या देण्याची सोय केली असल्याचे उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांनी ‘लोकमत’ला यावेळी सांगितले.

स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत

यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समितीशी संपर्ककरावा असे आवाहनही वसई - विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांनी पालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक मंडळ आणि नागरिकांना केले आहे.

यंदा प्रथमच प्रभाग समिती स्तरावर सर्व परवानग्या प्राप्त होणार असल्याने उपमहापौर रॉड्रीग्ज यांनी घेतलेल्या या स्तुत्य उपक्र माचे पालिका हद्दीतून स्वागत होत आहे, याउलट दरवर्षी हा उपक्र म अशाच पद्धतीने सुरू ठेवावा अशी ही मागणी सार्वजनिक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Permissions required for the festivities from the same section, the decision of the Vasai-Virar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.