फुलांसाठी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास परवानगी; वसईतील विक्रेत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:08 AM2018-11-22T00:08:07+5:302018-11-22T00:08:30+5:30

मुंबई परिसरात फूलविक्री करणाऱ्या वसईतील विक्रेत्यांवर बृहन्मुंबई महापालिकडून होण्या-या कारवाई पासून दिलासा मिळणार आहे.

 Permit to use a plastic bag for flowers; Relief for Vasai Vendors | फुलांसाठी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास परवानगी; वसईतील विक्रेत्यांना दिलासा

फुलांसाठी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास परवानगी; वसईतील विक्रेत्यांना दिलासा

Next

पारोळ : प्लॅस्टिक बंदीचा फटका बसलेल्या फुलविक्रेत्यांना फूलांच्या बांधणीसाठी ५१ मायक्रोन जाडीच्या पिशव्यांचा वापर करण्यास परवानगी देणारा अध्यादेश पर्यावरण खात्याने काढला असून त्यामुळे मुंबई परिसरात फूलविक्री करणाऱ्या वसईतील विक्रेत्यांवर बृहन्मुंबई महापालिकडून होण्या-या कारवाई पासून दिलासा मिळणार आहे.
वसई तालुक्यात पश्चिम व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी फुलांची शेती करतात या भागातून दररोज चाफा, आणि जास्वंदी याचे १५ लाख नग उत्पादन होऊन ते विक्री साठी दादरच्या बाजारात नेली जातात, मोगरा, जुई, सायली, तगर, ही फुले खराब होतात म्हूणन ती प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून वसईतून दररोज मुंबईत विक्रीसाठी पाठवली जातात. परंतु पर्यावरण विभागाने प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरास बंदी घातल्याने बाजारात विक्रीसाठी न्यावयाची फुले पॅकिंग कशी करायची हा प्रश्न वसईतील शेतकºयांच्या समोर उभा राहिला. फूलांच्या बांधणीसाठी अन्य पर्याय नसल्याने हे उत्पादन ५१ मायक्रॉॅन प्लॅस्टिकच्या पिशव्यामधून मुंबईला नेत होते पण त्यावर मुंबई महापालिकेकडुन कारवाई करण्यात येत होती, बंदी नंतर शासनाने किराणा दुकानदारांना १ किलोपर्यंत सामानाच्या बांधणीसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांना परवानगी दिली तशी परवानगी वसई तील फूलउत्पादकांना द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांकडे केली होती.
प्लॅस्टिकबंदीमुळे फुलांची बांधणी करता येत नसल्याने वसईतील हजारो फुल बागायतदारांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. शेतकºयांनी या बाबत शासनाकडे पाठपुरावा केला तर पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांनी ही हा विषय उचलून धरला यामुळे फुलांच्या बांधणी साठी सरकारने ५१ मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. आॅगस्ट महिन्यात फुलांच्या बांधणीसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यांचे आदेश काढण्यात आले नव्हते त्यामुळे वसई तील फुलविक्रेत्यांना मुंबई महापालिकेच्या कारवाई ला सामोरे जावे लागत असे पण आता पर्यावरण सचिवांनी ५१ मायक्रॉन च्या पिशव्या फुल बांधणीसाठी वापरण्याची परवानगी देणारा आदेश दिल्याने वसईतील फुलविक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या निर्णयामुळे वसईतील फुलविक्रेत्यांना दिलासा मिळाला असून दंडात्मक कारवाई आता मुंबई मध्ये होणार नसल्याने या निर्णयाचे फुलउत्पादकांनी स्वागत केले आहे.
- सुभाष भट्टे,
फूल उत्पादक, वसई

Web Title:  Permit to use a plastic bag for flowers; Relief for Vasai Vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.