वसईतही महिला कर्मचाऱ्याचा छळ

By admin | Published: May 29, 2016 02:43 AM2016-05-29T02:43:03+5:302016-05-29T02:43:03+5:30

वसई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील एका महिला लिपिकाचा मानसिक आणि शारिरिक छळ केल्याप्रकरणी त्याच कार्यालयातील एका महिलेसह तीन

Persecution of women employees in Vasai | वसईतही महिला कर्मचाऱ्याचा छळ

वसईतही महिला कर्मचाऱ्याचा छळ

Next

विरार : वसई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील एका महिला लिपिकाचा मानसिक आणि शारिरिक छळ केल्याप्रकरणी त्याच कार्यालयातील एका महिलेसह तीन कर्मचाऱ्यांविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बेबी चव्हाण असे तक्रारदार महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. चव्हाण ८ एप्रिल २०१५ ला वसईतील कार्यालयात कनिष्ठ लिपीक म्हणून कामावर रुजू झाल्या आहेत. त्यांचे पती चाळीसगाव येथे महावितरणमध्ये कामाला असून दोन मुलांसह तिथेच राहतात. चव्हाण सध्या वसईतील सरकारी निवासस्थानात एकट्याच राहतात.
कार्यालयातील कनिष्ठ लिपिक वाय. जी पवार, सी.के. पाटील आणी विद्या जोशी आपला शारिरिक आणि मानसिक छळ करीत असल्याची तक्रार चव्हाण यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठांकडे अनेक तक्रारी करूनही कुणीच दखल घेत नसल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

Web Title: Persecution of women employees in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.