लोखंड देण्याच्या नावाने लुबाडणारे सापळ्यात
By admin | Published: October 11, 2016 02:31 AM2016-10-11T02:31:26+5:302016-10-11T02:31:26+5:30
मनोर येथील एका व्यापाऱ्याला लोखंड देतो या बहाण्याने १ लाख ४४ हजार रूपयांचा चुना लावणाऱ्या दोघे भामटयांना मनोर पोलीस ठाण्यात अटक
मनोर : मनोर येथील एका व्यापाऱ्याला लोखंड देतो या बहाण्याने १ लाख ४४ हजार रूपयांचा चुना लावणाऱ्या दोघे भामटयांना मनोर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आले असून त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पंकज भाटी नावाच्या एका व्यापाऱ्याला स्टील (लोेखंड) एक ट्रक देतो म्हणून त्या दोघांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत शिमला ईन हॉटेल टाक व्हाल येथे बोलावून १ लाख ४४ हजार रूपये रोख घेऊन बोगस ट्रक नंबर देऊन दोघांनीही पळ काढला. घटनेची खबर मनोर पोलीसांना माहिती झाल्यावर मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी एम एल चाळके पो. उपनिरीक्षक अक्षय सोनवणे, गायकवाड, पवार, गाडेकर, चौधरी, पोलीस मित्र सोहेल नजीर खतीबसह पोलीसांनी १२ तासात गुन्हयाचा छडा लावला. वसीम बशीर पटेल (४५) रा. अर्जुन आळी पडघा भिवंडी व हरिश पुरोषोत्तम चौधरी उर्फ आरोरा (५४) वासना भावली रोड बडोदरा गुजरातमधून अटक करण्यात आले. न्यायाधिशाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. उपनिरीक्षक अक्षय सोनवणे मनोर पोलीस ठाणे गुन्हयाचा तपास करीत आहे. ते पुढे म्हणाले कि पकडलेले आरोपी कडून अनेक प्रकार उघडण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)