पेट्रोल-डिझेल करवाढीला विरोध
By admin | Published: October 6, 2015 12:05 AM2015-10-06T00:05:15+5:302015-10-06T00:05:15+5:30
राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सर्वसामान्य जनता भाववाढीने त्रस्त असतानाच भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेलची करवाढ केल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस
पालघर : राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सर्वसामान्य जनता भाववाढीने त्रस्त असतानाच भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेलची करवाढ केल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने नुकतीच पेट्रोल व डिझेलची प्रतिलीटर २ रु.प्रमाणे करामध्ये वाढ केल्याने वाहतुकीच्या खर्चात वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आधीच महागाईच्या खाईत होरपळणाऱ्या जनतेचे यामुळे पुरते कंबरडेच मोडणार आहे. केवळ मूठभर वर्गाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे.
त्यामुळे या दरवाढीचा निषेध काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर करण्यात येऊन जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, मनीषा सावे, सुरेंद्र शेट्टी, अरविंद क्षत्रिय, रुक्मिणी अंभिरे इ.नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
(वार्ताहर)