खांडचा बंदरा एक पिकनिक पॉर्इंट
By admin | Published: July 9, 2017 01:09 AM2017-07-09T01:09:59+5:302017-07-09T01:09:59+5:30
पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौदर्य लाभलेला विक्रमगडमधील पिकनिक पॉईंट म्हणजेच पलुचा धबधब्ब्यानंतर विक्रमगडकरांची ओळख
- राहूल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौदर्य लाभलेला विक्रमगडमधील पिकनिक पॉईंट म्हणजेच पलुचा धबधब्ब्यानंतर विक्रमगडकरांची ओळख असलेला व बारमाही पाणी असलेला खांडचा बंदरा असून निसर्गाने भरभरुन वरदान दिलेल्या या भागात पावसाळयात मनसोक्त आनंद लुटणाऱ्यांचीही गर्दी असते. निखळ निसर्ग सौर्द्य आणि बिन धोक्याची पाण्यातील मौज मस्ती हे येथील वैशिष्ट्य आहे.
शनिवार व रविवारी पलुचा धबधबा व खांडचा बंधारा येथे पर्यटकही येत असतात ़व पाण्यामध्ये डुुंबण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतात़ पुढील आठवडयात गटारीचे वेध लागत असल्याने बाहेरील पर्यटकांनी शुुक्रवार पासूनच येथे बुकींग करण्यास सुरूवात केली आहे़ जोडूनच दोन दिवस सुट्टी असल्याने येथे पिकनिक करण्यासाठी बाहेरील पर्यटक दाखल झाले आहेत़
पावसाळा सुरु झाला की, या नैसर्गिक सौदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुुभ्र धबधबे. विक्रमगडपासून डोंगर भागात उंचावर जंगल पसरलेले आहे़
हाच जंगलपट्टा निसर्गमित्रांना भुरळ घालतो. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्यानें पक्षी निरिक्षकही या भागात येत असतात़ खांडचा बंधाऱ्यात जून ते आॅक्टोंबर या काळात पर्यटकांची गर्दी असते. अन्य धबधबे धोकादायक ठरू लागल्याने सुरक्षित असणाऱ्या पिकनिक स्पॉटच्या शोधात असणाऱ्या तरुणाईची या स्पॉटला पसंती मिळते आहे.
बारा महिने पाण्याची हमी : विक्रमगड ग्रामपंचायत अंतर्गत याच बंधाऱ्यातून विक्रमगड शहर, यशवंतनगर, वाकडुचापाडा, टोपलेपाडा, संगमनगर आदी भागांना नळाद्वारे पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जातो़ या बंधाऱ्यास बाराही महिने पाणी असल्याने कधीही विक्रमगडकरांना पाण्याची टंचाई भासत नाही़ त्यामुळे सलग तीन वर्षे जरी पाऊस पडला नाही तरी येथे पाणी टंचाई उदभवणार नाही.त्यातच येथे छोटाचा चौकोनी आकाराचा हौदासारखा मोठा भाग असुन तो जास्त खोलगट नाही. त्यामुळे डुंबणाऱ्यांंना सुरक्षेची हमी मिळते.